आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The shooting of Salman Khan’s next ‘Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan’ has been completed.

अलीकडेच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा टिझर प्रदर्शित झाला. या टिझरला दर्शकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच, प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सलमान खानने आपल्या सोशल मीडियावर नवीन लूक शेअर करत आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’चे शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

तसेच, सलमानच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, फोटोमध्ये तो खूपच चार्मिंग दिसत आहे. आतापर्यंत निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित बहुतांश माहिती गुप्त ठेवली असून, फक्त काही लूक्स आणि टिझर रिलीज केला आहे जेणेकरून या सिनेमाबद्दल दर्शकांचा उत्साह वाढेल.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment