आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The release of the soundtrack of the song composed on Lata Mangeshkar to mark the 122nd birth anniversary of Master Dinanath Mangeshkar. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 122 व्या जयंतीचे औचित्य साधून टाइम्स म्युझिक निर्मित, भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरबद्ध केलेल्या आणि डॉ. दीपक वझे यांनी वंदनीय लतादीदींवर रचलेल्या पहिल्याच गीताच्या ध्वनीचित्रफितीचा प्रकाशन सोहळा गुरुवार दिनांक 29 डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात रात्री ८ वाजता आयोजित केला आहे. तुषार पानके यांनी याचे चित्रीकरण केले आहे.

त्यानिमित्ताने, विश्वस्वरमाऊली हा लतादीदींच्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.. केतकी माटेगावकर, सावनी रवींद्र, प्रियांका बर्वे आणि विभावरी आपटे जोशी ह्या कलाकारांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाला अजय मदन यांचे संगीत संयोजन लाभले असून निवेदन स्मिता गवाणकर यांचे आहे तसेच, पं. हरिप्रसाद चौरसिया आणि उषा मंगेशकर यांची प्रमुख उपस्थितीत लाभली आहे. आर्यन इन्स्टिट्यूट ऑफ चेस अँड आर्ट एक्सलन्स यांची प्रस्तुती असलेल्या या सोहळ्याला एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी चे विशेष सहकार्य लाभले असून संयोजन हृदयेश आर्ट्सचे आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.