आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The real warriors will be seen in Vivek Agnihotri’s upcoming film ‘The Vaccine War’. विवेक अग्निहोत्रीचा बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’च्या शूटिंगची सुरुवात झाली असून दर्शकांमध्ये या सिनेमाबद्दल उत्साह वाढत आहे. अशातच, हा चित्रपट भारतीय शास्त्रज्ञांसह त्या लोकांवर आधारित आहे ज्यांनी जगातील सर्वात प्रभावी लस तयार करण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ रात्रंदिवस मेहनतीने काम केले. ‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये जागतिक उत्पादकांच्या दबावाला तोंड देऊन आपल्या देशवासीयांचे प्राण वाचवण्यासाठी रात्रंदिवस मेहनतीने काम केलेल्या भारतीय शास्त्रज्ञांची कथा पाहायला मिळणार आहे.

अलीकडेच, चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “From the sets of #TheVaccineWar. Independence Day. 2023”.

अशातच, हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होण्याच्या तयारीत असताना, एका सुत्रानुसार असे समजते की, ‘सत्यकथेवर’ आधारित असलेल्या या चित्रपटात भारतातील खरे वॉरियर्स दिसणार आहेत.

याबद्दल बोलताना सूत्राने सांगितले, “हे सिख वोलेंटीअर्स आहेत ज्यांनी दुसऱ्या लाटेत आपला जीव धोक्यात घालून मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात मदत केली. #TheVaccineWar ही एक सत्य कथा आहे, त्यामुळे आम्ही शक्य तितक्या रिअल लोकांना कास्ट करत आहोत. ही सत्यकथा भारतातील खऱ्या योद्ध्यांसह एक सहयोगी चित्रपट व्हावी अशी आमची इच्छा आहे. जगातील काही प्रतिष्ठित संस्थांच्या सहकार्यासह सखोल संशोधनावर आधारित हा भारतातील ‘सत्यकथा’ शैलीतील पहिला चित्रपट असणार आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’या चित्रपटामार्फत भारतीय सिनेमांना एका नव्या स्तरावर नेण्याचा आणि चित्रपटांना भारताची सॉफ्ट पॉवर म्हणून वापरण्याचा प्रयत्न आहे.”

महामारीच्या काळात जगातील इतर देशांप्रमाणेच भारतानेही गेल्या दोन वर्षांत अनेक संकटांचा सामना केला आहे. तसेच, अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी लस तयार करण्यासाठी आणि डॉक्टरांनी रुग्णांचे उपचार करण्यासाठी खूप मेहनत केली.

अशातच, जिथे लोक कोरोनावरील विजयाचा आनंद साजरा करण्यात व्यस्त होते तिथे काही एजन्सी, पक्ष आणि मीडिया हाऊसेस सतत या विजयाची बदनामी करण्याच्या दिशेने वाटचाल करत होते. तेव्हापासून, विवेक अग्निहोत्री नक्षलवाद्यांविरुद्ध लढत असून त्यांचा पर्दाफाश करत आहेत. तसेच, भारतात बनवण्यात आलेली लस इतकी प्रभावी ठरली आहे की, देशाची लोकसंख्या १.४ अब्ज असूनही, नागरिकांवर कोरोनाचा परिणाम झालेला नाही. त्याचवेळी चीन, ब्रिटन आणि इतर अनेक देश 2023 मध्ये कोरोनाशी झुंज देत आहेत. विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’हा चित्रपट 15 ऑगस्ट 2023 रोजी 11 भाषांमध्‍ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment