आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

The Marathi film ‘Aani Baani’ produced by ‘Dinisha Films’ will be released in June.

‘आणीबाणी’ म्हटलं कि, ती सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी असते. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारी असते. पण आता मात्र चिंता वाढवायला नाही तर कमी करायला ‘मनोरंजनाची आणीबाणी’ लागू होणार आहे. लेखक अरविंद जगताप आणि दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी विनोदाची ही ‘आणीबाणी’ प्रेक्षकांसाठी आणली आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील अनेक दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग आहे. ‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट येत्या जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

दिग्ग्ज कलाकारांची मोट एकत्र बांधत सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप मनोरंजनाची मिसळ आपल्याला चाखायला देणार आहेत. मनोरंजनाची ही मिसळ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास दिनेश जगताप व्यक्त करतात.

कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत,पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर कलादिग्दर्शन सुधीर सुतार यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. डी.आय,..किरण कोट्टा आणि मिक्स,.. नागेश राव चौधरी यांनी केले आहे. छायांकन मंगेश गाडेकर यांनी केले असून या संकलन प्रमोद कहार यांचे आहे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment