आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The first poster of Manoj Bajpayee’s upcoming courtroom drama ‘Bandaa’ is out. तीन दशकांहून अधिक काळात अनेक संस्मरणीय पात्रे साकारल्यानंतर, मनोज बाजपेयी नुकत्याच पूर्ण झालेल्या त्यांचा आगामी चित्रपट ‘बंदा’सह पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणि चाहत्यांना प्रभावित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच, विनोद भानुशाली यांच्या भानुशाली स्टुडिओज लिमिटेड तसेच सुपर्ण एस वर्मा आणि झी स्टुडिओजने आपला आगामी कोर्टरूम ड्रामा चित्रपट ‘बंदा’च्या पहिल्या पोस्टरचे अनावरण केले आहे.

चित्रपटाच्या या ब्लॅक अँड व्हाईट पोस्टरमध्ये मनोज बाजपेयी यांना चष्म्यासह एका इंटेन्स लूकमध्ये पाहायला मिळेल. तसेच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनलेल्या या चित्रपटाचे शूटिंग जोधपूर आणि मुंबईमध्ये झाले असून, हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या शेवटच्या सीनचे शूटिंग करताना सर्व कलाकार आणि क्रू यांनी पॉवरहाऊस अभिनेता मनोज बाजपेयी यांचे उभे राहून अभिवादन केले, हा एक तीव्र कोर्टरूम सीन होता. यानंतर केक कापून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला. तसेच, या बहुप्रतिक्षित चित्रपटात केलेल्या कामाबद्दल संपूर्ण टीमने कृतज्ञतादेखील व्यक्त केली.

झी स्टुडिओज आणि भानुशाली स्टुडिओज लिमिटेड प्रस्तुत तसेच अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित सुपर एस वर्मा यांचा आगामी कोर्टरूम ड्रामा ‘बंदा’ची निर्मिती विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, आसिफ शेख आणि विशाल गुरनानी केली असून जुही पारेख मेहता यांनी सह-निर्मिती केली आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.