अभिनेत्री तापसी पन्नू येणारा ख्रिसमस आपल्या फॅन्स सोबत साजरा करणार आहे. अंशुला कपूर यांच्या फॅनकाइंडया संस्थेच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. भारतातील विविध राज्यात असलेल्या अनाथ मुलींना शिक्षण देता यावे यासाठी दान करणाऱ्या तिच्या फॅन्स पैकी ५ फॅन्स सोबत तापसी व्हर्च्युअल डेट वर जाणार आहे. याआधी पण तापसीने ‘नन्ही कली’ साठी काम केले आहे व म्हणूनच तिने तिच्या चाहत्यांशी संवाद साधण्याची आणि त्याच वेळी तरुण अनाथ मुलींना मदत करण्याची संधी हातातून जाऊ दिलेली नाही.
याविषयी बोलतांना तापसी म्हणते, “तुम्ही जर एखाद्या पुरुषाला शिक्षण द्याल तर तुम्ही त्या एका व्यक्तीला शिक्षण देता, पण जर तुम्ही एखाद्या महिलेला शिकवले तर तुम्ही संपूर्ण देश शिक्षित कराल. कोणतीही तरुण महिला शिक्षणापासून वंचित राहू नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. नन्ही कली माझ्या अंतःकरणाच्या अगदी जवळ आहे आणि मी माझ्या चाहत्यांना विनंती करते की त्यांनी या वंचित मुलींना शिक्षण मिळावे याकरिता दान द्यावे. चला, या ख्रिसमसमध्ये या मुलींच्या यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना करूया. “
ही मोहीम ७ डिसेंबरपासून सुरू होईल आणि २१ डिसेंबर रोजी संपेल. यात भाग घेण्यासाठी https://www.fankind.org/christmas-with-taapsee-pannu/23 यावर तुम्ही लॉग-इन करू शकता. फॅनकाइंड फंड राइजिंग हा प्लॅटफॉर्म चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींशी संपर्क साधण्याची संधी उपलब्ध करुन देते, ज्यामुळे संपूर्ण भारतभरातील विविध धर्मादाय संस्थांसाठी निधी उभारण्यास मदत होते.
Do you want to go on a virtual date with me this Christmas? Just log on to https://t.co/b82EwPowEB & donate now!Your donation will help @NanhiKali educate underprivileged girls in India, and get you a chance to virtually spend Christmas with me! So enter now! | @FankindOfficial pic.twitter.com/ETOTBtT5xu
— taapsee pannu (@taapsee) December 7, 2020