मंदिरात किसिंग सीन-नेटफ्लिक्स वादात!

‘सुटेबल बॉय’ या आपल्या वेब सिरीज मध्ये मंदिरातील चुंबन दृश्य दाखविल्यामुळे नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म च्या अडचणीत वाढ झाली आहे. सोशल मीडियावर रसिकांनी मोठ्या प्रमाणात #BoycottNetflix हा हॅशटॅग ट्रेंड केल्याने अजूनच गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री गौरव तिवारी यांनी नेटफ्लिक्सविरोधात मध्यप्रदेश पोलिसात मंदिर परिसरातील प्रेमी युगलांमधील चुंबन  दृश्य दाखविल्याची तक्रार केली आहे. शनिवारी तिवारी यांनी रीवाच्या एसएसपीला तक्रारीचे पत्र देऊन वेबसिरीज व नेटफ्लिक्सवर कारवाई करण्याची मागणी केली. तिवारी म्हणाले की, जर व्हिडिओ ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढला नाही तर ते याविरोधात रस्त्यावर येतील.
याबाबत तिवारी यांनी सांगितले की “नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुटेबल बॉय ही ही मालिका विक्रम सेठ यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे. ही नेटफ्लिक्सने तयार केली आहे. कार्यक्रमाच्या दुसर्‍या पर्वामध्ये एका हिंदू मुलीच्या मुस्लिम मुलाचे चुंबन घेण्याचे दृश्य दाखवले आहे. मध्य प्रदेशातील महेश्वर घाट येथील शिव मंदिर संकुलात हे चुंबन घेण्याचे दृश्य दाखविण्यात आले आहे”. ते म्हणाले की “हिंदू भावना दुखावण्याचा आणि लव्ह जिहादला चालना देण्यासाठी हा लज्जास्पद प्रयत्न आहे, जो हिंदू समाज सहन करणार नाही. महेश्वरकडे पाषाण युगातील असंख्य शिवलिंग आहेत. राणी अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीत ती अधिक दिव्य झाली. अशा महान शासकाचे कर्मभूमी आणि हिंदू श्रद्धा यांचे प्रतीक असलेल्या महेश्वर घाटातील चुंबन दाखविणे हे एक षडयंत्र आहे”
गौरव तिवारी म्हणाले की नेटफ्लिक्सने हा व्हिडिओ काढला नाही तर भाजप युवा मोर्चा रस्त्यावर उतरेल. तसेच तिवारी यांनी नेटफ्लिक्स अधिकारी मोनिका शेरगिल आणि अंबिका खुराना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
Website | + posts

Leave a comment