आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Sonu Nigam’s romantic song in ‘Circuitt’ marathi movie.

अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि हृता दुर्गुळे यांचं “सर्किट” या चित्रपटातलं रोमँटिक गाणं नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. “काहीसा बावरतो, काहीसा सावरतो….” असे हलकेफुलके शब्द असलेलं हे गाणं सोनू निगम यांनी गायलं असून, वैभव आणि हृता यांची छान केमिस्ट्री या गाण्यात पहायला मिळते आहे. आजवर अनेक कारणांनी चर्चेत असलेला “सर्किट” हा चित्रपट ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भांडारकर एंटरटेनमेंट आणि पराग मेहता प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली असून स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांचे गीतलेखन, अभिजीत कवठाळकर यांचे सुमधुर संगीत दिग्दर्शन, संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे यांची उत्तम केमिस्ट्रीही या गाण्यात दिसते. ताल धरायला लावणारं संगीत, हलके फुलके सहजसोपे शब्द असलेलं हे गाणं नक्कीच लक्षवेधी आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी आता उत्सुकता अधिकच वाढलीय.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.