प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा अभिनेता म्हणजे महाराष्ट्राचा एनेर्जेंटिक स्टार सिद्धार्थ जाधव. सिद्धूने नुकताच त्याचा एक भावनिक मात्र अतिशय बोलका असा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना त्याने दिलेले कॅप्शन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असून, या फोटोने जणू काही त्याला त्याच्या बालपणीच्या सिद्धूची आठवण करून दिल्याचे जाणवत आहे.

siddharth jadhav social media post

सगळ्यांनाच माहित आहे की, सिद्धार्थ अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून केवळ मेहनतीच्या जोरावर सुपरस्टार या पदापर्यत पोहोचला. कदाचित या लहान मुलाने त्याला त्याच संघर्षाच्या दिवसांची आठवण करून दिल्याचा भास त्याच्या या भावनिक पोस्ट मधून होत आहे. सिद्धार्थचा हा फोटो आणि ह्या फोटोचे शीर्षक खूप व्हायरल होत असून, फॅन्सने देखील त्याच्या या फोटोवर अनेक कमेंट्स आणि लाइक्स देत पसंतीची पोचपावती दिली आहे.

 

Website | + posts

Leave a comment