आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Shraddha Kapoor and Ranbir Kapoor starrer ‘Tu Jhooti Main Makkaar’ trailer released. लव रंजनचा बहुप्रतीक्षित रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर आज एका मेगा इव्हेंटमध्ये रिलीज करण्यात आला असून,  या ट्रेलरमध्ये लीड जोडीमधील उत्कृष्ट केमिस्ट्री, उत्कृष्ट व्हिज्युअल्स, उत्तम डायलॉग्स आणि एक संकल्पना पाहायला मिळेल जी आपल्या टायटलप्रमाणेच मजेदार, ट्विस्टने भरपूर आणि रिलेटेबल आहे. 

या चित्रपटाद्वारे पदार्पण करणार्‍या स्टँड-अप किंग अनुभव सिंग बस्सी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करत आपल्या विनोदी वन लाइनर्सने सर्वांचे मनोरंजन केले. तसेच, कार्यक्रमादरम्यान जेव्हा ‘झूठी’ श्रद्धा आणि ‘मक्कार’ रणबीर यांनी दिग्दर्शक लव रंजनसोबत स्टेज शेअर केला तेव्हा आपले किस्से सांगत सर्वांचे मनोरंजन केले. 

दरम्यान, आता या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची अपेक्षा वाढवली आहे. अशातच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.