आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

“यो यो मुंबईचा पावणा आलाय कोलीवाऱ्यान, दाढी मिशी करून यो बगतोय तोऱ्यान…..” असे धमाल शब्द असलेला मुंबईचा नवरा हा नवा म्युझिक व्हिडिओ खास गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आशय कुलकर्णी आणि सिद्धी तुरे ही नवी जोडी या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार असून, सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ शुक्रवार ३ सप्टेंबरला पाहता येईल. (Saptsur Music’s New Music Video Mumbaicha Navara Featuring Aashay Kulkarni and Siddhi Ture)

साईनाथ राजाध्यक्ष यांनी निर्मिती केलेल्या मुंबईचा पावणा या म्युझिक व्हिडिओच्या बीना राजाध्यक्ष सहनिर्मात्या आहेत. दर्शन दीपक नांदगावकर यांनी या म्युझिक व्हिडिओच्या गाण्याचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे. आशय कुलकर्णी हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. “माझा होशील ना”, “किती सांगायचंय मला”, “पाहिले न मी तुला” अशा मालिकांतून आशयनं प्रेक्षक पसंती मिळवली आहे. तर सिद्धी तुरेनं आतापर्यंत काही म्युझिक व्हिडिओ केले असून सिद्धीनंच हे धमाल गाणं गायलं आहे. सिध्दीने गायलेली कोळी गाणी खुप लोकप्रिय आहेत त्यातील सप्तसूर म्युझिकने प्रदर्शित केलेलं “वसईच्या नाक्यावर येशील का…” हे गाणे रसिकांना आवडले आहे. त्यांच्यासह रितू मापारेही यात असून अंकित शिंदे आणि दिव्या घाग कार्यकारी निर्माते आहेत. तर अमोल गोळेनं छायांकन, प्रितेश सुर्वे आणि पायल पिसाट यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. देवबागच्या निसर्गरम्य परिसरात हा म्युझिक व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे.

सप्तसूर म्युझिकनं गेल्या काही काळात सातत्यानं नव्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. त्यातून नवे गीतकार, संगीतकार, कलावंतासाठी मोठा मंच उपलब्ध झाला आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबर्समध्येही वाढ होत आहे. कोळी-आगरी बोलीभाषा, धमाल गीत-संगीत, आशय आणि सिद्धीची फ्रेश जोडी, उत्तम छायांकन या सगळ्यामुळे म्युझिक व्हिडिओ प्रेक्षणीय झाला आहे. खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने येणारा “मुंबईचा नवरा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवेल.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.