मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय सुपरस्टार वेबसिरीज मध्ये झळकणार,
पुष्कर जोग, सई लोकूर, उदय नेने आणि विनय येडेकर मुख्य भूमिकेत
 
कॅफेमराठी स्टुडीओज निर्मित, आकाश गुरसाले दिग्दर्शित शो
हंगामा प्ले आणि सर्व पार्टनर नेटवर्कवर आता उपलब्ध
हंगामा डिजीटल मीडियाच्या मालकीचा ‘हंगामा प्ले’, हा अग्रगण्य व्हीडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्म म्हणून प्रसिद्ध आहे. आज त्यांच्या ‘सनम हॉटलाईन’ या नवीन हंगामा ओरीजनलचे मराठी आणि हिंदी भाषांमध्ये लॉन्चिंग झाले. ही  एक विनोदी ढंगाची  वेबसिरीज असून ही सिरीज तीन कॉल सेंटर एक्झिक्यूटीव्ह भोवती गुंफलेली  आहे. हे तिघे एक अडल्ट हॉटलाईन चालवत असतात. अचानक एके दिवशी कलाटणी मिळते आणि तिघेजण खंडणीच्या जाळ्यात ओढले जातात. आयुष्याची चक्र उलटी फिरू लागतात. या कार्यक्रमात मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय लोकप्रिय चेहरे म्हणजे पुष्कर जोग, सई लोकूर, उदय नेने आणि विनय येडेकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कॅफेमराठी स्टुडीओज निर्मित, आकाश गुरसाले दिग्दर्शित शो आता हंगामा प्ले आणि त्याच्या सर्व पार्टनर नेटवर्कवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
एक दिवस इशान (पुष्कर जोग) आणि त्याचा मित्र अभिजीत (उदय नेने) यांना कॉल सेंटरमधली साचेबद्ध नोकरी गमावण्याची वेळ येते. आता पुढच्या आयुष्यात काहीतरी रोमांचकारी करण्याच्या इच्छेने हे दोघे एडल्ट हॉटलाईन सुरू करतात. या हॉटलाईनचे नाव सनम हॉटलाईन असते. ग्राहकांच्या कल्पना आणि इच्छांचे समाधान तंत्रज्ञानाच्या साह्याने करणारी ही सेवा असते. शिवानी (सई लोकूर) ही दोघांची सहकारी आणि इशानची प्रेयसी ही या मित्रांच्या लहानशा स्टार्ट-अपमध्ये सामील होते. तिघे मिळून ग्राहकांच्या मनीषा, काही काळ मजा म्हणून साथीदाराची इच्छा पूर्ण करतात. त्यांच्या छोटेखानी व्यवसायाला यश मिळते. मात्र, हा आनंद थोडाच वेळ पुरतो. त्यांच्या काही ग्राहकांना खंडणीसाठी कॉल येऊ लागतात. त्यानंतर घडामोडींची मालिका रंगू लागते. तिघांच्या आयुष्याला विनोदी कलाटणी मिळते. अपहरणाला वेगळेच वळण लागते, सनम हॉटलाईनचे ग्राहक खंडणी जाळ्यात अडकत जातात आणि इशान व अभिजीतच्या हातात बेड्या टाकण्यासाठी पोलीस इन्स्पेक्टर जीवाचे रान करतो. अशा स्वरुपाचे कथानक असलेली सनम हॉटलाईन नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ठरेल! 
या वेबसिरीजबद्दल बोलताना हंगामा डिजीटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले की, “आम्ही हंगामा ओरीजनल्ससोबत पुरस्कृत ओरीजनल कंटेंटची लायब्ररी तयार करत आहोत. आमच्या कथाकथनाचे जगभरातून कौतुक होत असून लोकांच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या रोचक कहाण्यांचा वेध या माध्यमातून घेतला जातो. सनम हॉटलाईन’च्या माध्यमातून आमच्या उपभोक्त्यांचे मनोरंजन करणारा आणखी एक शो प्रस्तुत होतो आहे. या कार्यक्रमाची कथाकथन शैली स्थानिक अंगाची असली, तरीही तिला ग्लोबल अपील आहे. आमचे आगामी ओरीजनल शो हे अधिक गुंतवून टाकणारा कंटेंट घेऊन येतील, हे सांगताना उत्साह संचारला आहे. आगामी वर्षात आमच्या मंचावरील प्रेक्षक संख्या 2.5x पटीने वाढविण्याकडे आमचा कल राहील.” 
निखील रायबोले हे कॅफेमराठी स्टुडीओजचे सह-संस्थापक आणि सीईओ असून ते म्हणाले की, “कॅफेमराठी’मध्ये आम्ही मनोरंजक आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या शो निर्मितीच्या दिशेने जिद्दीने कार्यरत आहोत. ‘सनम हॉटलाईन’ हि  विनोदी ढंगाची वेबसिरीज असून त्यात एकही खिन्न, उदासीन क्षण नाही. त्यामुळेच हि वेबसिरीज  प्रेक्षकांना रुचेल. मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही नामवंत कलाकार यामध्ये अदाकारी दाखवताना पाहायला मिळतील. हंगामा प्ले’समवेत पुन्हा एकदा काम करण्याची संधी फारच मजेदार होती. आम्हाला या मंचाच्या विस्तृत वितरण नेटवर्कद्वारेसर्वदूर पसरलेल्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचता येईल.” 
आता हि वेबसिरीज हंगामाचा व्हीडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्म, हंगामा प्ले’वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. एमएक्स प्लेयर, एअरटेल एक्स्ट्रीम अॅप, व्ही मूव्हीज अँड टीव्ही, अमेझॉन फायर टीव्ही, टाटा स्काय बिंज, डिशस्मार्ट स्टीक, डी2एच स्ट्रीम, डिशस्मार्ट हब, शिवाय मेघबेला ब्रॉडबॅंड, अलियान्स ब्रॉडबँड, एसीटी फायबरनेट आणि नेटप्लस यांच्यासारखे आयएसपी तसेच टीसीएल, वनप्लस टीव्ही, सोनी ब्राविया, सीव्हीटीई, तोशिबा आणि क्लाऊडवॉकर अशा स्मार्ट टीव्हींवर हंगामा प्ले’च्या माध्यमातून सनम हॉटलाईन आता उपलब्ध आहे. त्याशिवाय, हंगामाच्या शाओमी समवेतच्या भागीदारीने ग्राहक हंगामा प्लेद्वारे मी टीव्ही’वर हा शो पाहू शकतील. तसेच कालांतराने सोनीलाइव आणि फ्लीपकार्ट व्हीडिओवर देखील स्ट्रीम उपलब्ध होईल.
या वेबसिरीजमध्ये  काम करतानाच्या आपल्या अनुभवाविषयी सांगताना पुष्कर जोग म्हणाला की, “डिजीटल माध्यमावर काम करताना माझ्याच अदाकारीवर प्रयोगशील राहण्याची संधी मिळाली. कॅफेमराठी सोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटतो. हंगामा प्ले’वर प्रेक्षक नक्कीच शो’ची मजा घेतील याचा विश्वास वाटतो. त्यांच्या प्रतिक्रियांची वाट पहातो आहे.”
उदय नेने म्हणाला, “सनम हॉटलाईन बघताना हसून पोट दुखेल. आता विकएन्डला आपल्या मित्र-परिवारासोबत तुम्ही विनोदाचा आनंद घेऊ शकता. हा कार्यक्रम पहिल्या भागापासून तुमची करमणूक करेल. प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल. मला इतक्या सुंदर सहकलाकार, कॅफेमराठी आणि आकाश गुरसुलेसोबत काम करताना छान वाटले.” 
सनम हॉटलाईन आता हंगामा प्ले आणि त्यांच्या पार्टनर नेटवर्क’वर उपलब्ध आहे.
(Press Release)
इथे ट्रेलर पहा –

इथे शो पहा  – https://bit.ly/3lVGMK3 
Website | + posts

Leave a comment