आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
‘Rangkarmi Natak Samuha’ ready for empowerment of marathi drama industry
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने ‘रंगकर्मी नाटक समूह’ हे नाटयसृष्टीतील दिग्ग्ज मान्यवरांचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या पॅनलच्या वतीने नुकत्याच एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘साद प्रेमाची आस परिवर्तनाची’ या सूत्राने नाटक, रंगकर्मी, प्रेक्षक यांच्यातील सेतू म्हणून काम करण्यासाठी तसेच नाट्यसृष्टीचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आपल्या अनेक योजना व नव्या संकल्पनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला प्रशांत दामले, विजय केंकरे, अजित भुरे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, दिलीप जाधव आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
ज्येष्ठ नाटयकर्मी अजित भुरे यांनी प्रास्ताविक करत ‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलचे उद्दिष्ट व निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांची ओळख यावेळी करून दिली. हौशी, व्यावसायिक, प्रायोगिक, समांतर ह्यासारख्या रंगकर्मींबरोबरच ज्येष्ठ, कनिष्ठ रंगकर्मीना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल उपाययोजना तसेच रसिक आणि रंगकर्मी ह्यांच्यातील नातं जे हरवत चाललं ते नातं अधिक दृढ करण्याच्या प्रामाणिक उद्देशाने आम्ही आपणासमोर येत असल्याचे या ‘पॅनलने यावेळी सांगितलं. नाट्यपरिषदेच्या माध्यमातून नवनवीन अनेक संकल्पना राबविण्यासाठी तसेच नाट्यगृहांच्या अवस्थेबद्दल ठोस उपाययोजना करण्यासाठी ‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनल मध्ये प्रत्यक्ष कृती करणारी मंडळी आहेत आणि आपल्या कार्यातून त्यांनी ते वारंवार सिद्ध केलेले आहे. नाट्यसृष्टीचा प्रदीर्घ अनुभव असणारे रंगकर्मी या ‘पॅनलचे उमेदवार आहेत. आता गरज आहे ती मतदारांच्या प्रेमळ पाठिंब्याची आणि सहकार्याची.. असं सांगताना ‘रंगकर्मी नाटक समूह’ मधील सर्व उमेदवार व सदस्यांनी चांगल्या बदलासाठी केलेल्या सूचनांची योग्य ती दखल घेत भविष्यात रंगभूमीला पुढे नेण्याच्या दृष्टीने काम करण्याची ग्वाही दिली.
‘रंगकर्मी नाटक समूह उमेदवार यादी
मध्यवर्ती शाखा
प्रशांत दामले, विजय केंकरे, अजित भुरे , सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, दिलीप जाधव, सुशांत शेलार, सविता मालपेकर, विजय सूर्यवंशी
बोरीवली शाखा
नितीन नेरुरकर, उदय राजशिर्के, संजय देसाई, हेमंत बिडवे