आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

लोकप्रिय टीव्ही मालिका रामायणमध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी (Actor Arvind Trivedi) यांचे आज निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामानंद सागर यांच्या रामायणात त्रिवेदी यांने रावणाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना कमालीची आवडली होती. (Raavan from TV Serial Ramayan..Actor Arvind Trivedi passed away)

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद त्रिवेदी यांचे अंतिम संस्कार आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत होणार आहेत. ते बऱ्याच काळापासून आजारी होते, पण काल ​​रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची पुष्टी त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनीही केली आहे. रामायण या लोकप्रिय मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल व लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी यांनी अरविंद त्रिवेदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

‘रामायण’मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अरविंद त्रिवेदीच्या आणखी अनेक पात्रांचेही खूप कौतुक झाले. त्यांनी ‘विक्रम और बेताल ‘ या टीव्ही मालिकेतही काम केले. या मालिकेने ८० च्या दशकात दूरदर्शनवर बराच काळ वर्चस्व राखले.

अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा भाऊ उपेंद्र त्रिवेदी हे देखील गुजराती चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे आणि त्यांनी गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. अरविंद त्रिवेदी यांनी गुजराती भाषेत धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांद्वारे गुजराती प्रेक्षकांमध्ये मान्यता मिळवली, जिथे त्यांनी ४० वर्षे योगदान दिले. त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.