आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Producer-Director Vivek Ranjan Agnihotri revealed about the name of his upcoming film ‘The Vaccine War’. अलीकडेच, विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ची घोषणा केली, तेव्हापासून देशभरात हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. विवेकच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असताना, सोशल मीडियावर #HBDVivekranjan आणि #TheVaccineWar हे हॅशटॅग ट्रेंड करताना दिसले. विवेक रंजन अग्निहोत्री आणखी एक अनोखा विषय घेऊन येत असतानाच, चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी दर्शक उत्सुक असून, पूर्ण देशातून या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे.

दरम्यान, विवेक, त्याने ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचे नाव कसे ठेवले हे शेअर केले. हा चित्रपट वैज्ञानिकांची एक प्रेरणादायी कथा सांगेल ज्यांनी वैद्यकीय पायाभूत सुविधांशिवाय जगातील सर्वात सुरक्षित लस तयार केली. सोशल मीडियावर त्यांनी संशोधनाविषयी बोलताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले “का #TheVaccineWar?”

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट २०२३ रोजी दर्शकांच्या भेटीला सज्ज झाला असून, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment