ALTBalaji आणि  ZEE5 च्या आगामी ’पौरशपुर’ या आगामी वेब सिरीज च्या चमकदार पोस्टरमुळे चर्चा चांगलीच रंगली आहे. या सिरीज मध्ये शिल्पा शिंदे (राणी मीरावती), अन्नू कपूर (राजा भद्रप्रताप), शाहीर शेख (वीर सिंह), साहिल सलाथिया (भानु), मिलिंद सोमण (बोरिस), पोलोमी दास (कला), आदित्य लाल (प्रिन्स रणवीर) आणि अनंत विजय जोशी (प्रिन्स आदित्य) या भूमिकांमध्ये चमकणार आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या सिरीज चे मनोरंजक टीझर हे उत्साह वाढवणारे व या शोबद्दल अधिक जाणून घेण्यास उद्युक्त करणारे आहे. 

 

 

या टीझरमध्ये प्रतिभाशाली अभिनेता अन्नू कपूर राजा भद्रप्रताप सिंह असून तो ’पौरशपुर च्या राज्यावर राज्य करतो. एक असे राज्य, जेथे स्त्रियांना इच्छेची वस्तू मानली जाते आणि पुरुषांची संपत्ती मानली जाते. एक विषारी राजवंश,जेथे महिला राज्यात पुरुषांनी केलेल्या कोणत्याही मागणीस नकार देऊ शकत नाहीत. अष्टपैलू अभिनेत्री शिल्पा शिंदे, ’पौरशपुरची राणी मीरावती या रूपात बघायला मिळणार आहे. तिच्या ब्युटी विथ ब्रेन मुळे  ’पौरशपुर एक शक्तिशाली साम्राज्य बनते. मिलिंद सोमण ने साकारलेला बोरिस हा तृतीयपंथी असून  राज्यातील स्त्री-पुरुष समानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असतो. सचिंद्र वत्स दिग्दर्शित ही एक पिरियड वेब सिरीज असून ज्यात शिल्पा शिंदे, मिलिंद सोमण, साहिल सलाथिया, शाहीर शेख, अन्नू कपूर, अनंत जोशी, पोलोमी दास, फ्लोरी सैनी, आदित्य लाल आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

 

 

शाही विश्वासघात, दुय्यम दर्जाचा सामाजिक भेदभाव, स्त्रीत्व, राजकारण, सूड आणि स्त्रियांचे दु: ख या महाकाव्यात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

 

८ डिसेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ट्रेलरसाठी बघत रहा ALTBalaji आणि  ZEE5.

 

पहा टीझर इथे-

 

 

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.