रोमँटिक म्युझिकल हिरो या आपल्या इमेजला तडा देत अभिनेता आदित्य रॉय कपूरने आज त्याच्या आगामी ‘ओम-द बॅटल विदिन’ चा ऍक्शन-पॅक्ड फर्स्ट लूक शेअर केला आहे. आदित्य यात कधीही न दिसलेल्या अशा जबरदस्त फीट फिजिक असलेल्या माचो अवतारात दिसून येत आहे. आदित्यच्या फॅन्स साठी त्याचा हा फर्स्ट लूक सोशल मीडियावर नवीन ट्रेंड निर्माण करेल हे नक्की.
आदित्य रॉय कपूर आणि संजना संघी यांच्या आगामी ‘ओम-द बॅटल विदिन’ सिनेमाचे शूटिंग नुकतेच सुरु झाले. चित्रपट २०२१ सालच्या उन्हाळ्यात प्रदर्शित होणार आहे.
झी स्टुडीओज आणि अहमद खान, शायरा खान निर्मित ‘पेपर डॉल डॉट एंटरटेनमेंट प्रॉडक्शन’ हे ‘ओम-द बॅटल विदिन’ चे दिग्दर्शक आहेत कपिल वर्मा.