कोरोनाच्या आजारामुळे स्वास्थ्य बिघडलेल्या नाटक व्यवसायासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. हळूहळू आता नाटक अनलॉक होतंय. अभिनेता प्रशांत दामले व भरत जाधव यांनी एका व्हिडिओद्वारे याबाबत रसिकांसाठी संवाद साधला आहे. प्रशांत दामले यांचे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, भरत जाधव यांचे ‘पुन्हा सही रे सही’ व संकर्षण कऱ्हाडे यांचे ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांच्या आगामी डिसेंबर महिन्यातील प्रयोगांची तारीख व ऑनलाईन बुकिंग याची घोषणा करण्यात आली आहे. या व्हिडिओद्वारे प्रशांत व भरत यांनी नाट्य-रसिकांना सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून परत एकवार नाट्यगृहाकडे वळण्याचे आवाहन केले आहे.
पहा व्हिडीओ —
आषाढ घनासम खुली दाद रसिकांची, अन् उधळण व्हावी अविरत उन्मेषांची… हीच नटराजा चरणी विनंती करीत, पुन्हा रसिकांच्या सेवेत रुजु होतोय… मग येताय ना…
एका लग्नाची पुढची गोष्ट
Eka Lagnachi Pudhchi Goshta
ऑनलाईन बुकिंग आज आत्ता 12 वाजल्यापासून
पुन्हा सही रे सही
ऑनलाईन बुकिंग 1 डिसेंबर पासुन
तु म्हणशील तस
Tu Mhanshil Tasa
ऑनलाईन बुकिंग 4 डिसेंबर पासुन