आज मुंबईवरील टेरर हल्ल्याच्या १२ व्या स्मृतिदिनी, त्या हल्ल्यादरम्यान विविध हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट रुग्णांचे जीव वाचविणारे, डॉक्टर्स, नर्स व मेडिकल स्टाफ यांची कहाणी सांगणारी, नवी वेब सीरिज “मुंबई डायरीज:26/11” चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओ च्या ट्विटर हॅण्डलवरून त्याचा टीझर ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

 

या वेब सिरीजची निर्मिती व दिग्दर्शन निखिल अडवाणी याची असून कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी यांची यात प्रमुख भूमिका आहे. या हल्ल्यादरम्यान पोलीस, आर्मी व डॉक्टर्स यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्यात मेडिकल स्टाफ ने दिलेला लढा लोकांसमोर फारसा आलेला नाही. तोच या वेबसिरीज मध्ये मार्च २०२१ पासून दिसणार आहे. 

पहा ट्रेलर इथे- 

 

Website | + posts

Leave a comment