MayDay चे शूटिंग डिसेंबर पासून!

अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेत व दिग्दर्शक अजय देवगण चा Mayday (मेडे) या आगामी सिनेमाचे शूटिंग पुढील महिन्यात डिसेंबर मध्ये सुरु होत आहे. या सिनेमात अभिनेत्री रकूल प्रीत सिंग ची प्रमुख भूमिका असणार आहे. ११ डिसेंबरपासून या सिनेमाचे शूटिंग हैदराबाद येथे सुरु होणार असल्याचे कळते. सध्या हैदराबाद येथे सिनेमाची निर्मिती टीम सेट्स च्या उभारणीवर काम करीत आहे. कोवीड चा धोका लक्षात घेऊन हे शूटिंग बायो-बबल वातावरणात होणार असून जिथे सिनेमाच्या टीम मेम्बर्स शिवाय इतर कोणालाही प्रवेश नसेल व मेंबर्सची पण कोरोना टेस्ट निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. आपल्या आगामी ‘भुज’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी अजय देवगण हैदराबाद येथेच असून ते शूटिंग पूर्ण होताच Mayday चे काम तो हातात घेणार आहे. Mayday सिनेमाची निर्मितीसुद्धा अजय देवगणच करीत आहे. हैदराबाद येथील शूटिंग संपवून जेंव्हा टीम मुंबईत परतेल तेंव्हा त्यांना मुंबईत बिग बी अमिताभ बच्चन पुढील शूटिंगसाठी जॉईन होतील.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.