अलीकडच्या काळात सिंगल व्हिडीओ साँग्ज रसिकांना मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहेत. नवी कोरी गाणी संगीतप्रेमींच्या ओठांवर सहजपणे रुळतही आहेत. असंच एक नवं कोरं लव्ह साँग रसिकांच्या मनाचा वेध घेण्यासाठी सज्ज झालं आहे. प्राजक्ता फिल्म प्रोडक्शनची आणि पिकल म्यूजिक (Pickle Music) ची निर्मिती असलेलं ‘लंडनचा राजा’ हे प्रेमगीत (Londoncha Raja Marathi Love Song) बऱ्याच कारणांनी आपलं वेगळेपण जपणारं आहे. सध्या लाइमलाईटमध्ये असलेली शीतल अहिरराव आणि अभिजीत श्वेतचंद्र या कलाकारांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.

रेखा सुरेंद्र जगताप, नितीन माने आणि संजय शिंदे यांची निर्मिती आणि पिकल म्यूजिक प्रस्तुत असलेल्या ‘लंडनचा राजा… इटलीची राणी…’ या गाण्याच्या निमित्तानं रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शीतल आणि अभिजीत या गाण्यासाठी प्रथमच एकत्र आले आहेत. नैतिक खरस आणि प्रफुल्ल कांबळे यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे गीत त्यांनीच संगीतबद्धही केलं आहे. नैतिक आणि सोनाली सोनावणे यांच्या  आवाजात हे गीत रेकॅार्ड करण्यात आलं आहे. कैलाश काशिनाथ पवार यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून, अलिबागमधील निसर्गरम्य परिसरात हे गाणं शूट करण्यात आलं आहे. या गाण्यात रसिकांना एक लव्ह स्टोरी अनुभवायला मिळणार आहे. 

लंडनचा राजा व्हिडीओ साँग लिंक- Londoncha Raja | Marathi Love Song link

‘व्हीआयपी गाढव’ आणि ‘एचटूओ’ या मराठी चित्रपटांमध्ये झळकलेल्या शीतल अहिररावची मराठी प्रेक्षकांना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. शीतलनं आपल्या अभिनयकौशल्याच्या बळावर मराठी सिनेसृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिजीतनं यापूर्वी ‘व्वा पैलवान’, ‘तालीम’, ‘संजना’ या चित्रपटांद्वारे लक्ष वेधून घेतलं असून, सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या निमित्तानं रसिकांना अलिबागमधील निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी दिली आहे.

हेही वाचा – एकाचे कर्म, दुसऱ्याचे भविष्य… समांतर २ चे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Website | + posts

Leave a comment