आगामी ‘बच्चन पांडे’ सिनेमामध्ये आता अक्षय कुमार सोबत जॅक्वेलिन फर्नांडिस चमकणार आहे. चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्यातर्फे तशी अधिकृत घोषणा आज ट्विटरवर करण्यात आली. अक्षय सोबत जॅक्वेलिनचा हा चौथा चित्रपट असणार आहे. या दोघांसोबतच चित्रपटात क्रिती सॅनॉन व अर्शद वारसी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नाडियाडवाला प्रोडक्शन सोबत जॅक्वेलिनचा हा आठवा चित्रपट आहे. नाडियाडवाला यांची निर्मिती असलेल्या ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटातील जॅक्वेलिन चे ‘धन्नो’ हे गाणे खूप गाजले होते. साजिद यांची पत्नी वरदा खान हिने आज ट्विटरवर ही घोषणा केली. ‘बच्चन पांडे’ या सिनेमाचे शूटिंग ६ जानेवारी २०२१ पासून सुरु होणार आहे.
Welcome on board Jax for #BachchanPandey 🤩! We love having you backkk on the sets of NGE @Asli_Jacqueline ❤️🥰🤗 6th January, 2021 shoot beginssss, just can’t waitttt 🔥
#SajidNadiadwala @akshaykumar @kritisanon @ArshadWarsi @farhad_samji @NGEMovies pic.twitter.com/Q9vzErOLcA— Warda S Nadiadwala 🐎 (@WardaNadiadwala) December 1, 2020