जवळजवळ ७ महिन्यांपासून, कोरोना व्हायरस लोक-डाऊनमुळे सिनेमा हॉल बंद आहेत. याच परिणाम म्हणून अनेक छोटे, मध्यम आणि मोठ्या बजेटच्या चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी व प्रदर्शनाचा मार्ग स्वीकारला. अन-लॉक नंतर थेट सिनेमागृहात प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरला ‘सूरज पे मंगल भारी’. यानंतर आता ‘इंदू की जवानी’ या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनीही चित्रपटगृहात प्रदर्शनाचा निर्णय घेतला असल्याचे कळते.

 

कियारा अडवाणी ची प्रमुख भूमिका असलेला ‘इंदू की जवानी’ ११ डिसेंबर २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. हा अन-लॉक नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा दुसरा चित्रपट आहे. आत्तापर्यंत, थिएटर्सना केवळ ५०% क्षमतेवर चालण्याची परवानगी आहे. कियारा अडवाणी शिवाय ‘इंदू की जवानी’मध्ये आदित्य सील आणि मल्लिका दुआ यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अबीर सेनगुप्ता दिग्दर्शक असून मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी, निकिल अडवाणी, भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, निरंजन अय्यंगार आणि रायन स्टीफन यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट एका गाजलेल्या गाझियाबादच्या मुलीची कहाणी आहे जी ऑनलाइन डेटिंगच्या जगात प्रवेश केल्यावर निर्माण झालेल्या गोंधळात अडकून जाते.
Website | + posts

Leave a comment