आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘He is still very critical, not dead’: Vikram Gokhale’s daughter dismisses reports of death. विक्रम गोखले यांच्या मुलीने त्यांच्या मृत्यूचे वृत्त फेटाळून लावले आणि सांगितले की ते अत्यंत गंभीर आहेत आणि अद्याप त्यांचे निधन झाले नाही. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अजूनही नाजूक असून ते लाइफ सपोर्ट सिस्टमवर आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टरांनी विक्रम गोखले यांच्या निधनाच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

दुसरीकडे विक्रम गोखले यांच्या मुलीने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “ते अजूनही अत्यंत गंभीर आहेत आणि लाइफ सपोर्टवर आहे आणि अद्याप त्यांचे निधन झालेले नाही.  त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा.”

बुधवारी रात्री  ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर समोर आली, त्यानंतर अजय देवगण, रितेश देशमुख, अली गोनी आणि जावेद जाफरी यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विटरवर शोक व्यक्त केला. दरम्यान विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत त्या म्हणाल्या, “ते काल दुपारी कोमात गेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी प्रतिसाद देणे थांबविले आहे. ते  व्हेंटिलेटरवर आहेत. उद्या सकाळी त्यांची प्रकृती बघून डॉक्टर निर्णय घेणार आहेत.”

श्रीमती गोखले यांनी खुलासा केला की, विक्रम गोखले ५ नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आहेत. “सुरुवातीला त्यांच्यात थोडी सुधारणा झाली पण नंतर अचानक त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना हृदय आणि मूत्रपिंडासारख्या अनेक समस्या आहेत.”

विक्रम गोखले यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही मनोरंजनाच्या क्षेत्रात त्यांच्या अभिनयानं वर्चस्व केलं आहे. त्यांनी आता पर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. तर 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.