आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

ए आर व्हेंचर आयोजित फॅशनिस्टां ऑफ द इअर या सौंदर्यस्पर्धेचा अंतिम सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. ए आर व्हेंचर ही कंपनी मॉडेलिंग ऍक्टिंग णि गृमिंगशी संदर्भात असून अनुजा राव ह्या संस्थापिका आहेत. या कंपनीचा हा दुसरा शो आहे, त्यांचा पहिला ए आर के सुपरस्टार हा लहान मुलांचा शो देखील यशस्वी झाला होता. (Grand Finale Ceremony of “Fashionista of the Year” Beauty Contest Concluded recently)

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माविम च्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, श्री.जयेश खाडे , श्री जय श्रींगारपूरे, श्री प्रशांत जोशी, स्वरूप मीडियाचे श्री सचिन नारकर, आय लिफ बँकवेट्सचे श्री प्रतिष आंबेकर तसेच फॅशन इंडस्ट्रीशी निगडित अनेक मान्यवर उपस्थित होते. या शोसाठी ब्युटी कॉर्नर हे टायटल स्पॉन्सर्स होते तर ट्रेल अँप व आय लिफ बँकवेट हे असो पार्टनर होते. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.

यात मिस कॅटेगरीतून कु. श्रेया पगारे, कु श्रुती कांबळे, कु आंचल गोवेकर या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. मिस टिन मधून कु. तनिशा माजी व कस्तुरी महाजन यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला.मिसेस कॅटेगरीतून प्रणाली निमजे, दानिशा दास, इंदू हरजाई तर मिस्टर कॅटेगरीतून दानिश राजपूत, वैभव साटम आणि शाश्वत चिलवंत यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी फॅशन कोरीओग्राफर श्री अवि पायल, फेमिना मिस इंडिया गुजरात 2017 मिस अमरदीप कौर, दालन महाराष्ट्राचे अध्यक्षा पौर्णिमा शिरिस्कर तसेच इनामदार कंपनीच्या सौ श्वेता इनामदार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.