फर्स्ट किस पाहिले ३ कोटींच्या वर रसिकांनी!

 

सुप्रसिद्ध गायक यो यो हनी सिंग चे नवीन गाणे ‘फर्स्ट किस’ २३ नोव्हेंबर रोजी रिलीज झाले आहे. रिलीज झाल्यापासून गेल्या ६ दिवसात या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. टी-सिरीज कंपनीच्या यु-ट्यूब अकाउंटवर हे गाणे आत्तापर्यंत तब्बल ३ कोटी ४८ लाख लोकांनी पहिले आहे व सातत्याने हा आकडा वाढतच चालला आहे. सध्याला ट्विटरवर सुद्धा #FirstKiss या गाण्याचा हा हॅश टॅग ट्रेंडिंग आहे. यो यो हनी सिंग सोबत या गाण्यात इप्सिता मुख्य भूमिकेत दिसली आहे. या नवीन पार्टी सॉंग ला तरुणाईने पसंती दिली असून हनी सिंगच्या चाहत्यांसाठी तर हे गाणे म्हणजे एक नजराणा आहे.

 

 

Website | + posts

Leave a comment