आज भूमी पेडणेकर च्या आगामी हिंदी ‘दुर्गामती’ चे ट्रेलर लॉन्च झाले. दुर्गामती हा दाक्षिणात्य सिनेमा ‘भागमथी’  चा रिमेक आहे ज्यात अनुष्का शेट्टी ची प्रमुख भूमिका आहे. अनुष्का शेट्टी चा सोशल मीडियावर मोठा फॅन बेस आहे. आता झालं काय तर अनुष्का च्या फॅन्सला भूमीने साकारलेली ‘दुर्गामती’ काही विशेष वाटली नाही. म्हणून ‘दुर्गामती’ चे ट्रेलर आल्यापासून ट्विटर वर अनुष्काच्या फॅन्सने भागमथी मधील विविध सीन्स, पोस्टर्स जोरात शेअर करणे सुरु केले आहे. या पोस्ट शेअर करतांना बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य सिनेमा, अनुष्का विरुद्ध भूमी असे युद्ध पेटले आहे. अनेक ट्रोल्स ने मग यात उडी घेतली व मनोरंजक मिम्स पण शेअर केले. अनुष्काच्या फॅन्स चे असे म्हणणे आहे कि भूमी कधीच अनुष्काची बरोबरी करू शकणार नाही व एवढेच काय तर तिच्या आसपास पण येऊ शकणार नाही. अनुष्काने रंगविलेली भागमथी ही नेहमीच जास्त प्रभावी आहे असे तिच्या फॅन्सचे व सोबत बऱ्याच इतर रसिकांचेही म्हणणे आहे असे ट्विटर वरील ट्रेंड वरून दिसते.

ट्विटर वरील काही प्रतिक्रिया इथे देत आहोत, सोबत भागमथीचे ट्रेलरही. तुम्हीच ठरवा काय ते आता!  

पहा भागमथीचे ट्रेलर —–

Website | + posts

Leave a comment