दुर्गामतीचे ट्रेलर आउट! बघा इथे!

अक्षय कुमार, टी-सिरीज व विक्रम मल्होत्रा यांची निर्मिती असलेल्या ‘दुर्गामती’ चित्रपटाचे ट्रेलर आज रिलीज करण्यात आले असून, आज अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हॅण्डलवरून ते रिलीज केले आहे. ‘दुर्गामती’ च्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री भूमी पेडणेकर असून चित्रपट ११ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. दुर्गामती सिनेमात भूमी पेडणेकरने एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या आयएएस अधिकाऱ्याला समाजातील व राजकारणातील शक्तिशाली लोकांद्वारे षडयंत्र रचून एका भ्रष्टाचाराच्या खोट्या केसमध्ये अडकवले जाते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिला अशा घरात डांबले जाते जे भूत-पिशाच्च शक्तींने पछाडलेले आहे.

Website | + posts

Leave a comment