अक्षय कुमार, टी-सिरीज व विक्रम मल्होत्रा यांची निर्मिती असलेल्या ‘दुर्गामती’ चित्रपटातील विविध कलाकारांनी रंगविलेल्या पात्रांचे पोस्टर्स आज रिलीज करण्यात आले . ‘दुर्गामती’ च्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री भूमी पेडणेकर असून चित्रपट ११ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.

इतर प्रमुख कलाकारांमध्ये अर्शद वारसी, माही गिल, जिशू सेनगुप्ता, करण कापडिया यांचा समावेश आहे. दुर्गामती सिनेमात भूमी पेडणेकरने एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या आयएएस अधिकाऱ्याला समाजातील व राजकारणातील शक्तिशाली लोकांद्वारे षडयंत्र रचून एका भ्रष्टाचाराच्या खोट्या केसमध्ये अडकवले जाते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिला अशा घरात डांबले जाते जे भूत-पिशाच्च शक्तींने पछाडलेले आहे.

Website | + posts

Leave a comment