औरंगाबाद: सध्या सगळीकडे स्पर्धा निर्माण झाली आहे. कोरीया, युगांना किंवा इतर देशातून येऊन कुणीही स्पर्धा निर्माण करु शकतो. मात्र त्याला दोन हात करण्याची तयारी आपली असली पाहिजे. फिल्म मेकींग हे तंत्र आहे. आपल्याला जे भावतं ते मांडल पाहिजे. टेक्नालाँजी चांगली असेल तरच काम चांगल होत अस नाही तर तुमची आवड त्यामध्ये उतरली पाहिजे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन प्रख्यात दिग्दर्शक तथा उद्घाटक नागराज मुंजाळे यांनी केले. ते प्रोझोन मॉल येथे आयोजित आठव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सोहळ्या प्रसंगी बुधवारी (ता. ११) बोलत होते.

पुढे बोलतांना श्री. मुंजाळे म्हणाले की, फेस्टीवलमध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळतात. गोष्टीत नायक असतो. मात्र तो कितीही साधा असू शकतो. त्यामुळे त्याला कमी लेखू नये. यावेळी त्यांनी पुणे फेस्टीवलमध्ये आलेला पहिला अनुभव ही सांगितले. पुढे ते म्हणाले, पुण्या-मुंबईच्या बाहेर होणारे फेस्टीवल हे पूर्ण महाराष्ट्राला प्रेरित करणारं आहे. त्या पद्धतीने हा फेस्टीवल आहे. भाषा कोणतीही असू द्या. लोक चांगल बघतात. त्यांना चांगल दिलं पाहिजे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. यावेळी त्यांनी सरकार दरबारी काय अनुभव येतो याचाही उल्लेख केला.

या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, अभिनेते किशोर कदम (सौमित्र), दिग्दर्शक समीर पाटील, निर्माते नितीन वैद्य, दिग्दर्शक गिरीश मोहिते, अभिनेते उमेश कामत, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, फेस्टिव्हल डिरेक्टर अशोक राणे, फेस्टिव्हल आर्टिस्टिक डिरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, मनजीत प्राईड ग्रुपचे संचित राजपाल व नवीन बगाडिया, प्रोझोनचे सेंटर हेड कमल सोनी, आयनॉक्सचे सिध्दार्थ मनोहर, प्रवीण सूर्यवंशी, ज्ञानेश झोटिंग, डॉ. आनंद निकाळजे, सुहास तेंडुलकर, शिवशंकर फाळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

महोत्सवाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर महोत्सवाचे संचालक अशोक राणे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी या महोत्सवाच्या आयोजनाबद्दल भूमिका विषद केली. त्यानंतर महोत्सवाच्या कॅटलॉग आणि एमजीएम जर्नालिझम विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निना निकाळजे आणि निता पानसरे यांनी केले. आभार डॉ. रेखा शेळके यांनी मानले. उद्घाटन सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने झाली.अरुण खोपकर यांना पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार

मराठी लेखक, लघुचित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक अरुण खोपकर यांचा महोत्सव समितीतर्फे संयोजक अंकुशराव कदम आणि नंदकिशोर कागलीवाल यांच्या हस्ते पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

भानगड एकांकिकेचा सन्मान

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत भानगड या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वैष्णवी काळे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल नरवडे, सर्वोत्कृष्ट लेखक आशिष खरात, सर्वोत्कृष्ट अभिनय गोविंद रेंगे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ ला उदंड प्रतिसाद

यंदा फेस्टिव्हलच्या ओपनिंगला ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ चित्रपट दाखविण्यात आला. हा चित्रपट प्रौढावस्थेकडील आयुष्याचा प्रवास उलगडतो, जी केवळ वय वाढण्याची एक प्रक्रिया नाही. ही एक अशी गहन प्रक्रिया आहे जी काहीवेळा त्या लोकांना एका विशिष्ट प्रकारे कमकुवत करू शकते. या चित्रपटाची कथा नुसती वयात येणाऱ्या मुलांची कथा नाही तर त्यापेक्षाही अधिक गुंतागुंतीची आहे. स्पॅनिश भाषेतील कमिंग-ऑफ-एज, व्हॅलेंटीना मॉरेल दिग्दर्शित ड्रामा चित्रपटात रेनाल्डो अमीन गुटिएरेझ, डॅनिएला मारिन नॅवारो, व्हिव्हियन रॉड्रिग्ज आणि अॅड्रियाना कॅस्ट्रो गार्सिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ग्रेगोइर डेबैली आणि बेनोइट रोलँड यांनी निर्मित केलेला हा चित्रपट कोस्टा रिका, बेल्जियम आणि फ्रान्सची सहनिर्मिती आहे.


औरंगाबादचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी www.aifilmfest.in या वेबसाईटवर तसेच info@aifilmfest.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती तथा यशवंतराव चव्हाण सेंटर, औरंगाबाद जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सचिन मुळे, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे डायरेक्टर अशोक राणे, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. अपर्णा कक्कड, आकाश कागलीवाल, डॉ. आशिष गाडेकर, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर शिव कदम, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, सुहास तेंडूलकर, डॉ. रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, डॉ. मुस्तजीब खान, मंगेश मर्ढेकर, सुबोध जाधव,किशोर निकम, डॉ. कैलास अंभुरे, निखिल भालेराव आदींनी केले आहे.

१२ जानेवारी रोजी बघा हे चित्रपट 

पाथर पांचाली, अपराजीतो, अपूर संसार, साताओ, अकिर्की कोच, मास्टर क्लास – लेखक अरुण खोपकर, “घर, बंदूक, बिर्याणी सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित”, अपराजीतो, मास्टर क्लास – समीर पाटील (बाहुबली ), नाइट रायडर , महानगर (वन नाइट इन खाटमांडू) नेपाळी सिनेमा, अलबोर्डा श्रीलंकन सिनेमा, ओ टी, ऑल अबाऊट माय गर्ल, ब्लडी ऑरेंजस, हल मॅड्रिड.

या महोत्सवासाठी नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर, मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन, माहिती व प्रसारण मंत्रालय, एन एफ डी सी, महाराष्ट्र शासन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.