कुली नं-१ चे ट्रेलर येतंय २८ नोव्हें. रोजी!

येत्या ख्रिसमस म्हणजे २५ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओ वर प्रदर्शित होणाऱ्या ‘कुली नं १’ या आगामी चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. चित्रपटाचा नायक अभिनेता वरुण धवन याने आज ट्विटर वरून हि माहिती दिली. वरुण चे वडील, प्रख्यात निर्माता दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचे दिग्दर्शन लाभलेला हा ४५ वा चित्रपट असणार आहे. 

९० च्या दशकात गोविंदा च्या प्रमुख भूमिकेत सुपरहिट ठरलेला ‘कुली नं १’ चित्रपटाचाच हा रिमेक आहे. प्रख्यात निर्माते वाशू भगनानी यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून वरुण सोबत नायिकेच्या भूमिकेत सारा अली खान दिसणार आहे. परेश रावल, जावेद जाफरी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहेत. आधी ठरल्याप्रमाणे कुली नं १ हा  १ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार होता परंतु कोरोना लॉक-डाऊन मुळे ते लांबले.

आता सिनेमागृहात प्रदर्शन न होता थेट अमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या २८ नोव्हेंबर रोजी येणाऱ्या ट्रेलर्सची रसिक मोठ्या उत्कंठतेने वाट बघत आहेत. 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.