आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Conclusion of Goa International Film Bazaar.गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म बाजाराची  गुरुवारी सांगता झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र, चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत यंदा राख, पोटरा, तिचं शहर होणं, पल्याड या चार सिनेमांची निवड करण्यात आली होती. या सिनेमांची इंडस्ट्री स्क्रिनींग येथे झाली. त्याला चित्रपट जाणकारांनी चांगला प्रतिसाद दिला. चित्रपटाच्या जागतिक व्यासपीठावर उपलब्ध करून दिलेल्या संधीबद्दल चित्रपटांच्या निर्माता, दिग्दर्शकांनी राज्य शासन आणि महामंडळाचे आभार व्यक्त केले.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना फिल्म बाजारात महामंडळामार्फत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामुळे चारही चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी फिल्म बाजारात मार्कटिंगसाठी प्रयत्न केला. या कालावधीसाठी महामंडळाने येथे फिल्म ऑफिस देखील घेतले होते. त्यामुळे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी देशी- परदेशी चित्रपट निर्माते, जाणकारांसोबत दीर्घ चर्चा करणे, बैठका करणे सोईचे झाले. मुख्य म्हणजे फिल्म ऑफिसची करण्यात आलेली देखणी-आकर्षक सजावट फिल्म बाजारात चर्चेचा विषय ठरली.

अशाप्रकारे मराठी या प्रादेशिक भाषेतील चित्रपटाना जागतिक स्तरावर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ करत असलेल्या प्रयत्नांचे जाणकारांनी भरभरून कौतुक केले.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment