आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Celebrating 100 days of ‘Kantara’, Rishabh Shetty announces the prequel of the film.

होंबाळे फिल्म्सच्या ‘कांतारा’ने आपल्या उत्कृष्ट कथानक आणि सीन्सने दर्शकांची मने जिंकली आहेत. केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 450 कोटींची कमाई करत बोलबाला केला. तसेच, बॉलिवूड सेलिब्रिटींपासून जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या चित्रपटाचे कौतुकही केले. इतकेच नाही तर ‘कांतारा’हा 2022 चा धमाकेदार ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून उदयास येऊन वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरला.

प्रेक्षक अजूनही ‘कांतारा’बद्दल उत्साही असतानाच, या चित्रपटाच्या सिक्वेलच्या अफवांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे. सिनेमाला मिळालेल्या उदंड यशानंतर, प्रेक्षक याच्या सिक्वेलच्या घोषणेची वाट पाहत असतानाच, निर्मात्यांनी आता अखेर चित्रपटाच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hombale Films (@hombalefilms)

नुकतेच कांताराने 100 दिवस पूर्ण केले असून, या क्षणाचा आनंद घेत चित्रपटाच्या टीमने सेलिब्रेशन केले. या खास प्रसंगी चित्रपटाचे लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी ‘कांतारा’च्या सिक्वेलबद्दल खुलासा केला आणि म्हणाले, “आम्ही प्रेक्षकांचे खूप आभारी आहोत ज्यांनी ‘कांतारा’ला अपार प्रेम आणि पाठिंबा देऊन हा प्रवास पुढे नेला, सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादाने या चित्रपटाने यशस्वीरित्या 100 दिवस पूर्ण केले आहेत. अशातच, या विशेष प्रसंगी मी ‘कांतारा’च्या प्रीक्वेलची घोषणा करत आहे. तुम्ही पाहिलेला पार्ट 2 आहे, पार्ट 1 पुढील वर्षी येईल. ‘कांतारा’ चित्रपटाचे शूटिंग करत असताना ही कल्पना माझ्या मनात आली कारण कांताराचा इतिहास अधिक खोल आहे. तसेच, या सिनेमाच्या लिखाणावरही आम्ही काम करत आहोत. संशोधन अद्याप सुरू असल्याने चित्रपटाबद्दल तपशील उघड करणे फार लवकर होईल.”

‘कांतारा’च्या प्रीक्वेलची निर्मिती होंबाळे फिल्म्स अंतर्गत विजय किरागंदुर आणि चालुवे गौडाद्वारा होणार असून, या चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.