भूमी बनली दुर्गामती!

अक्षय कुमार, टी-सिरीज व विक्रम मल्होत्रा यांची निर्मिती असलेल्या दुर्गावती सिनेमाचे नाव बदलून आता ‘दुर्गामती’ करण्यात आले असून, आज एका ट्विटर पोस्टरद्वारे अक्षय कुमारने सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. ‘दुर्गामती’ च्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री भूमी पेडणेकर असून चित्रपट ११ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.
दुर्गामतीमध्ये भूमीसोबत अर्शद वारसी, जिशु सेनगुप्ता, माही गिल आणि करण कपाडिया हे मुख्य भूमिकेत आहेत. जी अशोक दिग्दर्शित, दुर्गामती हा हॉरर-थ्रिलर तेलगू चित्रपट ‘भागमठी’ (२०१८) चा हिंदी रिमेक आहे. सिनेमाचे नवीन पोस्टर व शीर्षक जाहीर करताना अक्षय कुमारने ट्विटर वर लिहिले आहे-  Are you ready? Meet #DurgamatiOnPrime on Dec 11”

 

दुर्गामती सिनेमात भूमी पेडणेकरने एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या आयएएस अधिकाऱ्याला समाजातील व राजकारणातील शक्तिशाली लोकांद्वारे षडयंत्र रचून एका भ्रष्टाचाराच्या खोट्या केसमध्ये अडकवले जाते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिला अशा घरात डांबले जाते जे भूत-पिशाच्च शक्तींने पछाडलेले आहे.
Website | + posts

Leave a comment