अभिनेत्री स्वरा भास्कर हिची, रसभरी आणि फ्लेश नंतर, आता नेटफ्लिक्सवर ‘भाग बिनी भाग’ ही नवीन सिरीज आजपासून प्रदर्शित झाली आहे. यात स्वरा एका स्टॅन्ड अप कॉमेडियन च्या भूमिकेत असून या भूमिकेसाठी स्वराने बरीच तयारी केली आहे. या सिरीज मध्ये स्वरा सोबत वरुण ठाकूर व रवी पटेल मुख्य भूमिकेत आहेत. स्टॅन्ड अप कॉमेडियन च्या रोलसाठी स्वराने स्वतः लिखाणही केले, स्टेजवर जाऊन माईकसमोर ते परफॉर्म सुद्धा केले. सुरुवातीला हे सर्व करणे स्वराला अतिशय अवघड गेले असे तिने तिच्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले. अनुभव बस्सी या कामात तिचा प्रमुख मार्गदर्शक होता. बऱ्याच स्टॅन्ड अप कॉमेडियन शी स्वराने याबाबत संवाद साधला व त्यांचे शोज पाहिले.

 

स्वराच्या म्हणण्याप्रमाणे एका स्त्रीने सांगितलेल्या जोक्स पेक्षा आपला समाज हा कुठल्याही पुरुषांनी सांगितलेल्या जोक्सवर सहजपणे हसतो. या सिरीजची कथा एका उदयोन्मुख स्त्री कलाकाराची आहे जिचे पालक तिच्यावर समाधानी नाहीत. तिचे प्रेम प्रकरणही गुंतागुंतीचे आहे आणि ती  स्वत: सुद्धा स्वतःवर समाधानी नाही. त्यानंतर ती स्टॅन्ड अप कॉमेडी करण्यास सुरवात करते. ही एक विनोदी वेब सिरीज आहे.

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.