बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा जी सध्या प्रेग्नन्सी च्या दिवसांचा अनुभव घेत आहे. तिने आज पती क्रिकेटर विराट कोहलीच्या मदतीने स्वतः शिरसासन करत असल्याचे, काही दिवसांपूर्वीचे जुने छायाचित्र इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. गरोदरपणात योगा करण्याचे महत्त्व सांगत अनुष्काने एक छोटी नोट पण लिहिली आहे. ती  म्हणते- “हा व्यायाम हात खाली (आणि पाय वर करणे) सर्वात कठीण आहे. योग हा माझ्या आयुष्याचा महत्वाचा व अविभाज्य घटक आहे व माझ्या डॉक्टरांनी मला गरोदरपणा पूर्वी करत असलेले काही आसने वगळता, इतर आसनांसाठी परवानगी दिली आहे.” अनुष्काने पुढे लिहिलं आहे की तिने शिरसासन करत असताना सपोर्ट साठी भिंतीची व बॅलन्स करिता नवरा विराट ची मदत घेतली आहे. मी हे कित्येक वर्षांपासून करते आणि आता माझे प्रशिक्षक मला हे करण्यासाठी ऑनलाईन मदत करतात.” 

 

तिने हे छायाचित्र शेअर करताच तिचे चाहते, मित्र यांनी त्यावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पाडला. त्यात खासकरून प्रीति झिंटा, रकुल प्रीत सिंग, मौनी रॉय आणि झरीन खान या तिच्या बॉलिवूडमधील मैत्रिणींनी कमेंट मध्ये हार्ट चे इमोजी टाकले आहेत. दरम्यान, विराट सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत मालिकेसाठी भारताबाहेर असून बीसीसीआयने त्याची पितृत्व रजा मंजूर केल्यामुळे लवकरच तो भारतात परतणार आहे. त्यांच्या कुटुंबात या नव्या सदस्याचे आगमन जानेवारी २०२१ मध्ये अपेक्षित आहे. 

Website | + posts

Leave a comment