आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Anuradha, a 7-part Marathi Web Series directed by Sanjay Jadhav, is now on Planet Marathi OTT. संजय जाधव दिग्दर्शित ‘अनुराधा’ ही ७ भागांची वेबसिरीज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’, व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

नुकताच या वेबसिरीजच्या पोस्टर आणि टिझर प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. टिझरमध्ये तेजस्विनीचा बोल्ड अंदाज दिसत असून तिच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा दिसत आहेत. हे रहस्य काय आहे, हे लवकरच आपल्या समोर येईल.‘अनुराधा’च्या निमित्ताने संजय जाधव वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण करत असून हिरालाल दाफडा आणि आकाश दाफडा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या वेबसीरिजचे लेखन संजय जाधव, वैभव चिंचळकर यांचे असून पंकज पडघम यांचे संगीत लाभले आहे. तर संकलनाचे काम अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी पाहिले असून कला दिग्दर्शक सतीश चिपकर आहेत.

आपल्या या पहिल्या प्रोजेक्टबाबत दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, ‘’ आजवर अनेक चित्रपट केले आहेत प्रथमच वेबसीरिज करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यासाठी उत्सुकही आहे. एकंदरच संमिश्र मनःस्थिती आहे. आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या आवडत्या टीमसोबत मी नवीन प्रोजेक्ट करतोय. आशा आहे प्रेक्षकांना माझा हा नवा प्रयत्न नक्कीच आवडेल.’’

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.