आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Akshay Kumar will play the lead role in the film based on Jaswant Singh Gill. पूजा एंटरटेनमेंट आणि अक्षय कुमार लवकरच प्रेक्षकांसमोर एका भारतीय नायकाचे शौर्य सादर करणार आहेत. निर्माते या आगामी चित्रपटामार्फत अभियंता जसवंत सिंग गिल यांची खरी जीवनकहाणी पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. जसवंत सिंग गिल यांनी १९८९ मध्ये कोळश्याच्या खाणीत अडकलेल्या कामगारांना अत्यंत कठीण परिस्थितीत वाचवले होते.

केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री – भारत सरकार श्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर स्वर्गीय गिल यांचे स्मरण केले आहे. तसेच, पडद्यावर अशी आदरणीय भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने भारावून गेलेल्या अक्षय कुमार ट्विटरद्वारा आपला आनंद व्यक्त करत म्हणाला, “या कथेसारखी दुसरी कथा नाही!”. या घोषणेबद्दल त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करताना वाशू भगनानी यांनी रिट्विट केले.

अशातच, या चित्रपटाचे दिग्दर्शन टिन्नू सुरेश देसाई करणार असून, यांनी यापूर्वी अक्षय कुमारसोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘रुस्तम’मध्ये काम केले आहे.

पूजा एंटरटेनमेंट हे, निर्माते वाशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सर्वात मोठे आणि अग्रणी चित्रपट निर्मिती गृह आहे. हा स्टुडिओ काही प्रकल्पांना पाठिंबा देत असून, याआधी ‘कुली नंबर 1’, ‘बीवी नंबर 1’, ‘रेहना है तेरे दिल में ‘, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘फालतू’, ‘जवानी जानेमन’ यांसारखे मनोरंजक चित्रपट दर्शकांसमोर सादर केले आहेत.

अक्षय कुमार अभिनीत आणि पूजा एंटरटेनमेंटद्वारा निर्मित हा अनटायटल्ड रिअल लाइफ रेस्क्यू ड्रामा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित दर्शकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.