“आदिपुरुष” येतोय ११ ऑगस्ट २०२२ रोजी!

मराठी चित्रपट “लोकमान्य-एक युग पुरुष” व हिंदी चित्रपट “तान्हाजी” या दोन्ही सुपरहिट कलाकृती नंतर आपले मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत यांनी नुकतीच ‘रामायण’ वर आधारित “आदिपुरुष” या भव्यदिव्य अशा आगामी सिनेमाची घोषणा केली होती. आज ट्विटर वर त्यांनी त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ३डी असणार आहे. ‘सेलिब्रेटिंग व्हिक्टरी ऑफ गुड ओव्हर इव्हील’ अशी या सिनेमाची टॅगलाईन असणार आहे. या चित्रपटात प्रभास व सैफ अली खान प्रमुख भूमिकेत असणार आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांचे असून, निर्मिती निर्मिती टी-सिरीज करणार आहे व सहनिर्माते म्हणून ओम राऊत, प्रसाद सुतार व राजेश नायर हे असणार आहेत. ‘आदिपुरुष’ हिंदी भाषेसोबतच तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२१ साली या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असून ११ ऑगस्ट २०२२ साली हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शन स्टेज मध्ये असून इतर कलाकारांची निवड फायनल झाल्यावर अधिकृत घोषणा होणार आहे.
ओम राऊत व “आदिपुरुष” च्या सर्व टीमला या बिग बजेट प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा.
Website | + posts

Leave a comment