आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

A grand finale of the Ajanta Ellora International Film Festival.
औरंगाबाद: आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो. या दोन्हीला कौतुकाची थाप मिळाल्यास आणखी बळकटी मिळते. तुम्ही जिथे असाल तिथे प्रत्येक माध्यमातून कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या संगीत आणि नाटक अकॅडेमी तथा डब्ल्यू 20 इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी केले. त्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समरोपावेळी रविवारी (ता. १५) बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर डब्ल्यू २० इंडियाच्या मुख्य समन्वयक धरित्री पटणायक, विशेष पोलिस निरीक्षक के. एम. प्रसन्ना, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक संचालक विभिक्षण चावरे, फिल्म सिटीचे संचालक अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना, महोत्सव संयोजक अशोक राणे, ज्युरी चेअरमन जुडी ग्लाडस्टोन, संयोजक नंदकिशोर कागलीवाल, संयोजक नीलेश राऊत, दशरथ खजिनदार, आयनॉक्स सेंटर संचालक कमल सोनी, सोनाली कुलकर्णी, श्वेता बसू प्रसाद, एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजक चंद्रकांत कुलकर्णी, एन. विद्यासागर, दिग्दर्शिका प्रतिमा जोशी, एमजीएमचे कुलगुरू विलास सपकाळ, एमजीएमचे कुलसचिव आशीष गाडेकर, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सीईओ दीप्ती नखाले, ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


महाराष्ट्र राज्याचे चित्रपट धोरण
फिल्म सिटीचे अध्यक्ष अविनाश ढाकणे म्हणाले की, हा चित्रपट महोत्सव मोठा होतोय. त्यामुळे एका मोठ्या उंचीवर हा महोत्सव जाईल. महाराष्ट्र राज्य चित्रपट उद्योगाचे नेतृत्व करतो. हे आपल बलस्थान आहे. चित्रपटाचे धोरण ठरवले जात आहे. ते ठरविण्यासाठी सूचना पाठवू शकता. पुढील दीड ते दोन महिन्यात हे धोरण ठरवले जात आहे. न बघितलेली महाराष्ट्रीय निमित्ताने समोर आणला जाऊ शकतो. सगळी यंत्रणा ऑनलाईन राबविली जाईल.

पुढच्या वर्षी बाल चित्रपट महोत्सव
प्रस्तावनेत नंदकिशोर कागलीवाल म्हणाले की, या वर्षी महोत्सवात दाखविण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट दाखविण्यात आले. त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चित्रपट हे समाजामध्ये संदेश पोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. औरंगाबाद शहराला हा नव्या उंचीवर नेऊन ठेवणारा हा महोत्सव आहे. पुढच्या वर्षी बाल चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येईल. अशोक राणे म्हणाले की, महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद सगळ काही बोलतोय. हा महोत्सव सर्वांनी यशस्वी केलाय. चित्रपटांना चांगले प्रेक्षक औरंगाबादमध्ये आहेत, ही आनंदाची बाब आहे.

चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की, हा महोत्सव दरवर्षी थाटामाटात साजरा करू. या माध्यमातून फक्त मराठी सिनेमा न जोडता भारत जोडण्याचे प्रयत्न केले जातात. जो सिनेमा चांगला असतो तो माणसाची क्षमता वाढवतो. चित्रपट, नाटक आणि साहित्यात भारतीय स्त्री उभारली जाते. चित्रपटात स्त्रियांचा सहभाग सर्वांगीण झाला आहे. चित्रपटाचे तांत्रिक प्रशिक्षण इथे देण्याचा प्रयत्न पुढील वर्षापासून केला जाईल. महोत्सवात सिनेमा एकत्र येऊन बघण्याचा आनंद वेगळा असतो. तिथे त्यावर चर्चा होते, संवाद होतो आणि चित्रपट समजून घेतला जातो. हा महोत्सव संपूर्ण आठवड्याचा केला जावा, अशी मी संयोजकांना मागणी करतो. त्याचप्रमाणे पुढील वर्षी हा महोत्सव मकर संक्रांत ते प्रजासत्ताक दिना दरम्यान आयोजित केला जाईल.

विशेष पोलिस निरीक्षक के. एम. प्रसन्ना म्हणाले की, चित्रपटातून भावना मांडण्याचे काम होते. चित्रपटाला भाषा आणि जागेचे बंधन नसते. या महोत्सवामुळे नव्या दिग्दर्शकांना प्रोत्साहन मिळेल. अंकुशराव कदम म्हणाले की, भारताची राजधानी औरंगाबाद होती. चित्रपटाचे केंद्र औरंगाबाद व्हावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वी भावे हिने केले. आभार निलेश राऊत यांनी मानले.

Directed by Dipankar Prakash, 'Nanera', based on a Rajasthani story, won the 'Suvarna Kailasa' award for the best film.

‘नानेरा’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘सुवर्ण कैलासा’ पुरस्कार
राजस्थानी कथानकावर आधारित दीपांकर प्रकाश दिग्दर्शित ‘नानेरा’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाला ‘सुवर्ण कैलासा’ पुरस्कार मिळाला. सुवर्ण कैलासासोबत ‘नानेरा’ने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट कथानकाला देण्यात आला. तर, फ्रीप्रेस्की भारतीय ज्युरी पुरस्कार दीपांकर प्रकाश दिग्दर्शित ‘नानेरा’ या हिंदी चित्रपटाला देण्यात आला. ऑडियन्स चॉईस अवॉर्ड ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ या स्पॅनिश चित्रपटाला देण्यात आला.

भारतीय सिनेमा गटातील अवॉर्ड
सर्वोत्कृष्ट चित्रपट- नानेरा
सर्वोत्कृष्ट अभिनेता- जीतू कमल (अपराजीतो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- अक्षता पांडवपुरा (चिकन करी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- दीपांकर प्रकाश (नानेरा)
सर्वोत्कृष्ट कथानक- दीपांकर प्रकाश (नानेरा)
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार- अपेक्षा चोरनाअल्ली (चिकन करी), भूमिका दैमारी (सिफन फ्लूट)
सर्वोत्कृष्ट सहायक कलाकार- अशोक कानगुडे (ग्लोबल आडगाव)
मोस्ट इंस्पायरिंग स्टोरी- ‘ताठ कणा’
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- सुप्रीतम भोल (अपराजीतो)
सर्वोत्कृष्ट एडिटर- मयुर तेला (नानेरा)
सर्वोत्कृष्ट साउंड- तीर्थांकर मुजुमदार (अपराजीतो)
सर्वोत्कृष्ट संगीत- प्रेमलज्योती मिश्रा (अपराजीतो)

‘पाखर’, ‘मास्तरची स्कुटर’ लघुपटाला पुरस्कार
मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धेचे सिल्व्हर कैलासा पुरस्कार ‘पाखर’ (दिग्दर्शक सतीश दूताडमल) या लघुपटाला जाहीर झाले. तर याच गटात स्पेशल ज्युरी पुरस्कार ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘परदा’ या लघुपटाना देण्यात आला. एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स शॉर्ट फिल्म स्पर्धेचे विजेतेपद स्वप्नील सरोदे दिग्दर्शित
‘मास्तरची स्कुटर’ या लघुपटाने पटकावले.

‘पाचोळा’ चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित
मराठवाड्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या कादंबरीवर आधारित ‘पाचोळा’ या चित्रपटाचा ट्रेलर आठव्या अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सची असून शिव कदम यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसह स्थानिक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

सिनेक्षेत्रातील दिवंगत कलाकारांना आदरांजली
मागील दोन वर्षांत निधन झालेले सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार दिलीप कुमार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, वत्सला देशमुख, विक्रम गोखले, गायक बप्पी लाहिरी, भुपिंदर सिंग, पंडित बिरजू महाराज, शिवप्रसाद शर्मा, शिवकुमार, के.के. सुधीर नांदगावकर आदी दिवंगत कलाकारांना एका विशेष चित्रफितीच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली.

एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन
एमजीएम विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘आठव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’च्या मागील पाच दिवसांच्या घडामोडींवर आधारित विशेषांक काढला. या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ.रेखा शेळके आणि डॉ.विवेक राठोड यांच्या मार्गदर्शनात पूजा येवला, संजना खंडारे, रीना महतोले, आर्या राऊत, विनोद पवार, प्रियांका ठोसर, आकाश बाबर, अतिफ अहमद, वृषाली निकुम, अदिती खडकीकर, मनस्वी ढवळे, समर्थ दंडगव्हाळे, मधुरम सोलकेपल्ली, संयम देशमाने, करण जाधव, अभिमान चव्हाण या विद्यार्थ्यांनी चार दिवस चित्रपट महोत्सवाचे वार्तांकन करत हा विशेषांक प्रकाशित केला.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.