रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी व कबीर खान दिग्दर्शित ८३ हे दोन बिग बजेट सिनेमे आधी दिवाळी आणि नंतर ख्रिसमस मध्ये रिलीज होणार असल्याच्या बातम्यांना रिलायन्स एंटरटेनमेंट ने पूर्णविराम दिला आहे. दोन्ही सिनेमा पुढील वर्षी २०२१ ला रिलीज होणार असल्याचे रिलायन्स एंटरटेनमेंट तर्फे सांगण्यात आले आहे. दोन्हीची निश्चित तारीख अजूनही घोषित करण्यात आलेली नाही.
दोन्ही सिनेमे ओटीटी वर प्रदर्शित न करता सिनेमागृहातच प्रदर्शित करण्याच्या निर्णयावरही रिलायन्स ठाम आहे. दोन्ही सिनेमांचे भले मोठे बजेट, देशभरात अजूनही सर्व राज्यात न उघडलेली सिनेमागृहे, उघडलेल्या सिनेमागृहांना प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद व ५०% आसन मर्यादा या प्रमुख कारणांमुळे या दोन्ही सिनेमांचे प्रदर्शन परत एकवार लांबणीवर टाकण्यात आले असल्याचे समजते. जर परिस्थिती सुधारली तर दोनपैकी एखादा सिनेमा २६ जानेवारी २०२१ च्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा रिलायन्सचा मानस आहे.
Website | + posts

Leave a comment