भल्या मोठ्या ब्रेक नंतर आजपासून शाहरुख खान याने यशराज स्टुडिओ येथे त्याच्या आगामी ‘पठाण’ सिनेमाचे शूटिंग सुरु केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत सिद्धार्थ आनंद व निर्माते आहेत यशराज फिल्म्स. ‘झिरो’ या सिनेमाच्या अपयशानंतर शाहरुख खान याने एकही सिनेमा साइन केलेला नव्हता. ‘पठाण’ या सिनेमाची स्क्रिप्ट त्याला आवडल्यानंतर त्याचे शूटिंग सुरु होणार होते परंतु कोरोना लोकडाऊन मुळे ते लांबणीवर पडले होते, जे आजपासून सुरु झाले. ‘पठाण’ मध्ये शाहरुख खान सोबत जॉन अब्राहम व दीपिका पदुकोण यांच्या भूमिका आहेत. ‘पठाण’ हा यशराज फिल्म्सचा बिग बजेट प्रोजेक्ट असून पुढील वर्षी दिवाळीला रिलीज करण्याचा त्यांचा मानस आहे.
Website | + posts

Leave a comment