कियारा अडवाणी आणि वरुण धवन यांनी ”जुग जुग जीयो” या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक आज ट्विटर पोस्ट द्वारे शेअर केला आहे.  धर्मा प्रोडक्शन्स या चित्रपटाची निर्मिती करीत असून अनिल कपूर आणि नीतू सिंग-कपूरही यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. चित्रपटाचे सर्व कलाकार नुकतेच चंदिगडला या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना झाले होते. आज वरुण आणि कियाराने आपल्या चाहत्यांसाठी फर्स्ट लूक रिलीज केला आहे.
चित्रपटात वरुण आणि कियारा नवरा-बायकोची भूमिका साकारत आहेत आणि फर्स्ट लूकमध्ये त्यांची केमिस्ट्री छान जुळून आल्याचे दिसत आहे. कियारा ने आपल्या ट्विट मध्ये “हॅपी हसबैंड, हॅपी लाइफ!” असे पोस्ट केले आहे तर वरुणने आपल्या पोस्टवर म्हटले आहे की, “हॅपी वाइफ हॅपी लाइफ! 2021 ”. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार असून याचे शूटिंग दोन दिवसांपूर्वी सुरु झाले आहे.
Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.