बॉलिवूडमध्ये आज तब्बल १० वर्षे पूर्ण करणारे प्रख्यात चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मनीष शर्मा सांगत आहेत की बँड बाजा बारात हा कसा त्यांचा पहिला चित्रपट नव्हता याबद्दल 

मनीश शर्मा हा तसा बॉलिवूडसाठी आउटसाइडर चित्रपट निर्मात्यांपैकी. आज दहा वर्षांपूर्वी त्याचा सिने-प्रवास सुरु झाला. आजच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘बँड बाजा बारात’ ने (बीबीबी) ज्यात रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा या दोघांनी दमदार अभिनय केला होता. चित्रपटाच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त, मनीषने खुलासा केला की ‘बीबीबी हा काही त्याचा पहिला चित्रपट ठरणार नव्हता’ 

आदित्य चोप्रा जे मनीष च्या कामाने खूप प्रभावित झाले होते त्यांनी ही जबाबदारी मनीष वर सोपवण्यापूर्वी मनीष यशराज फिल्म्स (वायआरएफ) मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्यानंतर मनीष वायआरएफमध्येच खऱ्या अर्थाने तयार झाला व आदित्य चोप्रा यांचा विश्वासू सहकारी बनला. फना, आजा नचले आणि रब ने बना दी जोडी यासारख्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक असलेल्या मनीष याने सांगितले की, ‘बीबीबी’ नव्हे तर ‘फॅन’ (शाहरुख खान यांच्यासमवेत दिग्दर्शित) हा त्याचा पहिला चित्रपट असावा अशी त्याची इच्छा होती. 

“मी ‘आजा नचले’ पूर्ण करत होतो तेव्हा मी आदिला सांगितले की मला ‘फॅन’ बनवायचा आहे. तो म्हणाला की हा एक अतिशय महत्वाकांक्षी चित्रपट आहे आणि तू या कल्पनेवर अधिक काम केले पाहिजे. त्यानंतर, २ महिन्यांनंतर, आदीने मला पुन्हा कॉल केला आणि मला वायआरएफमध्ये येण्यास सांगितले. त्याने मला सांगितले की तो एसआरके बरोबर एक चित्रपट बनवित आहेत, ज्याला आपण आता ‘रब ने बन दी जोडी’ या नावाने ओळखतो आणि तू या चित्रपटावर काम करावे अशी त्याची इच्छा आहे. अर्थातच, मी ठीक आहे असे म्हणालो. रब ने संपवत आल्यावर,आदी म्हणाला, ‘मला वाटते की आता आपण तुझ्या पहिल्या दिग्दर्शनाची योजना आखली पाहिजे’. मला आनंद झाला! मी म्हणालो, “ग्रेट, चला फॅन करूया! ”

तथापि, आदित्य चोप्राच्या सल्ल्याने मनीष त्यावेळेस निराश झाला! मनीष म्हणतो, “आदीने सांगितले की फॅन हा तुझा पहिला चित्रपट असू शकत नाही कारण तो खूप मोठा आणि महत्वाकांक्षी चित्रपट आहे. तो म्हणाला की तू महत्वाकांक्षी नव्हे तर काहीसा मिड-साईज प्रोजेक्ट चा विचार केला पाहिजे. मी हे ऐकून खरोखर खूप निराश झालो होतो. मला असे वाटले की मला माझ्या ड्रीम प्रोजेक्ट वर काम न करू देता कुठल्या तरी मिड साईज प्रोजेक्ट वर आता काम करावे लागणार ”

परंतु मनीषने आदीचा सल्ला ऐकला. तो म्हणतो, “मी स्वत: ला समजावले की ठीक आहे एका नव्या चित्रपटावर काम करण्याची गरज आहे.बिट्टू आणि श्रुती ही पात्रे माझ्या आयुष्यात कुठेतरी आली होती. जेव्हा मला माझी पात्रं मिळाली, तेव्हा मी कथेवर काम केले आणि बॅन्ड बाजा बारात बनला. दिग्दर्शक म्हणून माझा पहिला चित्रपट, थँकफुली तो चांगला झाला.”

आजच्या तरुणाई मध्ये कल्ट (ऑल टाइम फेव्हरेट) स्टेटस निर्माण झालेला असा चित्रपट ‘बीबीबी’ बनवण्याच्या प्रवासाविषयी मनीष सांगतो, “जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट बनवायला निघता , तेव्हा तुम्हाला नेहमीच एक चांगला चित्रपट बनवायचा असतो, ज्यातून एक कथाकार व  दिग्दर्शक म्हणून तुमचा हेतू काय आहे हे प्रेक्षकांना समजावे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, मी कधीच बॅन्ड बाजा बारात लिहायला सुरुवात करेपर्यंत या चित्रपटाचा किंवा त्या पात्रांचा विचार केला नव्हता, मला केवळ फॅन नावाचा एक थ्रिलर बनवायचा होता.” 

मनीष पुढे म्हणतो की – “माझा पहिला चित्रपट म्हणून मी जे काही बनवले ते अगदी वेगळे होते. ही एक रोमँटिक कॉमेडी आहे परंतु प्रवासाच्या अंती झाले असे की मीच बिट्टू आणि श्रुती या पात्रांच्या प्रेमात पडलो होतो. हे कसे घडले ते अतिशय परिस्थितीजन्य होते कारण मला हवा तसा माझा पहिला चित्रपट मी बनवणार नव्हतो आणि मी मग मी स्वतःशी जुळवून घेतले. मला वाटतं या प्रक्रियेमध्ये घडलं असं की जिथून मी आलोय तिथे मी परतलो, त्या गल्ल्यांमध्ये परतलो. कथेपेक्षाही बिट्टू आणि श्रुती या पात्रांना घडविण्यात जास्त वेळ दिला गेला आणि या नैसर्गिक व सहज भावनेने हा प्रवास घडला ”

Website | + posts

Leave a comment