– विवेक वि जोगळेकर

आज ‘धर्मेंद्र देओल’ यांचा ८५ वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १९३५ मधे नसराली, पंजाब येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच अभ्यासापेक्षा त्यांचे मन सिनेमातच रमत असे. अगदी शाळेला दांडी मारून सुध्दा.

१९४९ मधे आलेला ‘दिल्लगी’ हा सिनेमा गाण्यासाठी त्यांनी ४० वेळा पाहीला होता. पिळदार शरीरयष्टीचा हा हिरो सर्वांना खुप आवडला. ‘शोले’मधील हाणामारी करणारा रांगडा गडी वीरू, ‘चुपके चुपके’ तील काॅमेडी करणारा घासफूस का डाॅक्टर, ‘सत्यकाम’, ‘नया जमाना’, ‘दोस्त’ चा आदर्शवादी, ‘जीवन मृत्यू’ चा सरदारजी, ‘सिता और गीता’ तील मदारी राका अशा विविधरंगी भूमिकांतून त्याने १९६० ते १९९० ची तीन दशके सिनेजगतावर राज्य केलं.

जवळजवळ २०० सिनेमातून त्यांनी अभिनय केला. चांगला अभिनय करून सुध्दा फिल्मफेअर पुरस्काराने त्यांना चार वेळा हुलकावणी दिली. १९६२ चा ‘अनपढ’, १९६३ चा ‘बंदीनी’ आणि ‘सुरत और सिरत’, १९६६ चा ‘फूल और पत्थर’, असे किती उल्लेखनीय सिनेमा त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘फुल और पत्थर’ सिनेमांत सलमानच्या आधी त्यांनी अंगातला शर्ट काढून आपले शरीर सौष्ठव दाखवले. सलमान व ऋतिक रोशन ही त्यांचे चाहते आहेत. अर्जुन हिंगोरानी यांनी १९६० मधे एका अभिनय प्रतियोगितेमधे त्याच्यातील कलाकाराला हेरले. सर्वप्रथम ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमातून सिनेजगताला त्यांची ओळख करून दिली. त्या साठी धर्मेंद्र ला केवळ रू ५१ सायनिंग अमाऊंट मिळाली होती. हा सिनेमा फारसा चालला नाही. यात त्यांची सह अभिनेत्री कुम कुम होती.

उदरनिर्वाहासाठी सुरवातीस त्यांनी रेल्वे बुकींग क्लार्कची नोकरी पण केली. मालासिन्हा, मीनाकुमारी, रेखा, हेमा मालिनी आशा पारेख सह सर्व मान्यवर अभिनेत्रीबरोबर त्यांनी काम केले. अमिताभ बरोबर अनेक सिनेमांत त्यांच्या जोडीतील सामंजस्य फारच छान होते. मीना कुमारी बरोबरचे चे प्रेम प्रकरण खुपच गाजले. मीनाकुमारीच्या सहवासात ते शेरोशायरीच्याही प्रेमात पडले. अनेक शायरांची, मीनाकुमारीची शेरोशायरी त्यांना जबानी याद होती व आहे. ते स्वतःपण उत्तम शायर आहेत होते.

त्यांनी हेमा मालीनीशी दुसरे लग्न केले. तिच्याबरोबर त्यांची जोडी चांगलीच गाजली. त्यांनी त्या आधी १९ व्या वर्षी प्रकाश कौर शी लग्न केले होते. व एकाचवेळी दोन लग्न करण्यास हिंदू धर्मात परवानगी नसल्याने मुस्लीम धर्म स्विकारला होता. पहिल्या पत्नीपासून सनी आणि बाॅबी हे मुलगे, विजेता व अजिता मुली आणि हेमा मालीनीच्या ईशा व आहना अशा सहा मुलांचे ते पिता आहेत. बाप, बेटे यांच्या ‘अपने’ नंतर आता नातू करण सोबत ‘अपने-२’ येत आहे. कारकिर्दीच्या अखेरीस अनेक ब दर्जाच्या सिनेमांत त्याने काम केले. पण सनीच्या सांगण्यावरून ते बंद केले.

‘शोले’च्या सेटवर हेमा मालीनीचा जास्त सहवास मिळावा म्हणून रिटेक वर रिटेक करायला लावले होते. त्यांची स्टंट दृष्ये ते स्वतः देत असतं. पंजाबी असूनही नृत्य आणि मदीरा ही त्यांची कमजोरी होती व आहे. तसेच पडद्यावर फाईट करता येत होती पण कधी नीट रडता आले नाही. नुकतेच त्यांनी आशा पारेख बरोबर एका संगीत कार्यक्रमात हजेरी लावली. आणि त्या दोघांवर चित्रीत गाण्यावर पुन्हा अभिनय करत जुन्या स्मृतीत रंगून गेले.

२०१२ मधे भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला. त्यांनी भाजप तर्फे बिकानेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली व जिंकली. पत्नी मुलगा व ते स्वतः सुध्दा खासदार झाले हा विलक्षण योगायोग आहे. पण राजकारणात त्यांचे मन रमले नाही. शेती हा त्याचा मुळचा पिंड असल्याने सध्या राजकारण व सिनेमापासून दुर लोणावळ्या जवळच्या आपल्या फार्म हाऊस वर दोन्ही पत्नीपासून दूर एकटेच शांत व आनंदी जीवन जगत आहेत. आपले जीवन व्यतीत करीत आहेत. आपण त्यांना शुभकामना देऊ या.

Website | + posts

Leave a comment