– वृषाली जिमी

कोणताही चित्रपट हिट होण्यामागे बरीच कारणे असतात. पटकथा, दिग्दर्शन, संगीत, अभिनयासारख्या बर्‍याच गोष्टी ‘क्लिक’ व्हायला लागतात. तेव्हा कुठे चित्रपट हिट ठरतो! चित्रपटाच्या यशात किंवा अपयशात चित्रपटातील नायक-नायिकांचा सिंहाचा वाटा असतो. कित्येक वेळा मिडिओकर चित्रपट त्यातील ‘स्टार्स’मुळे चालतात. हिरो-हिरोईनच्या लोकप्रियतेवर ऑडियन्सला चित्रपटगृहाकडे खेचून आणण्याच्या त्यांच्या अ‍ॅबिलिटीवर चित्रपटाचे ‘फेट’ अवलंबून असते. आजपर्यंतच्या बॉलीवूड चित्रपटांच्या इतिहासात आपण बघितले आहे की, सिनेमातील हिरो-हिरोईनच्या जोडीवरही चित्रपटाचे यश-अपयश असते. या ‘हिट’ जोड्यांनी कित्येक चित्रपट हिट करविले आहेत. आता या जोड्या क्लिक होण्यामागे कित्येक कारणं असतात. कधी एकमेकांना अभिनय क्षमतेत कॉम्प्लिमेंट करणारे दोन स्टार ‘हिट जोडी’ बनून जातात, तर कधी गुड लुकिंग अ‍ॅक्टर्स हिट जोडी बनून जातात. कुणाची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री हिट ठरते, तर कुणाची ऑफ-स्क्रीन अफेअर्स फायद्याची ठरतात. कधी-कधी तर एखादी जोडी हिट होण्यामागचे कारणच लक्षात येत नाही!

आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये अशा कित्येक ‘हिट’ जोड्या झाल्या आहेत; पण हिट पेअर म्हटल्यावर सर्वप्रथम स्मरणात येतात राज कपूर आणि नर्गिस! ही जोडी म्हणजे अगदी इम्पॉर्टल! दोघे उत्कृष्ट अभिनेते आणि दोघांचे फॅन फॉलोविंगही जबरदस्त. त्यांची जोडी क्लिक झाली यात काही नवल नाही. त्यात दोघांची केमिस्ट्रीही टू गुड! ‘चोरी चोरी’, ‘श्री 420’, ‘आग’, ‘आह’, ‘आवारा’, ‘बरसात’सारखे त्यांचे कित्येक चित्रपट सुपरहिट ठरले. राज कपूरला ‘राज कपूर’ बनविण्यात नर्गिसचा बराच हातभार होता, असे म्हणायला हरकत नाही. रुपेरी पडद्यावरील रोमान्सेसमध्ये राज कपूर आणि नर्गिस सर्वात यादगार. टाईमलेस कपल्समध्ये हे दोघेच सर्वांच्या पुढे आहेत.

Raj Kapoor-Nargis in Awaara
Raj Kapoor-Nargis in Awaara

त्याकाळच्या चित्रपटांमधील आणखी एक अतिशय लोकप्रिय जोडी आणि माझी पर्सनल फेव्हरेट म्हणजे दिलीपकुमार आणि वैजयंती माला. नर्गिस आणि राज कपूरप्रमाणेच हे दोघेही कुशल अभिनेते. दोघेही एकेमकांना उत्कृष्ट साथ द्यायचे. हँडसम दिलीपकुमार आणि सुंदर, सोज्वळ वैजयंतीमालाची बातच काही और, दिलीपकुमारची नक्कल अजूनही आपले नट करतात, तर वैजयंतीमालाचा गोडवा अजूनही कोणत्या नटीत आढळला नाही. या दोघांचेही कित्येक चित्रपट सुपरहिट ठरले. ‘नया दौर’, ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’, ‘लीडर’सारख्या कित्येक चित्रपटांमध्ये ही जोडी झळकली. ‘माँग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब-जब जुल्फे तेरी’, ‘ढूँढो-ढूँढो रे साजना’, ‘दिल धडक-धडक के’सारखी त्यांची कित्येक एजलेस रोमँटिक क्लासिक्स आहेत. जसे राज कपूर म्हटल्यावर नर्गिस आठवतेच, तसेच दिलीपकुमारचे नाव घेतले की, वैजयंती माला डोळ्यांसमोर येतेच. दिलीप कुमारबरोबर मीना कुमारीची जोडीदेखील बर्‍यापैकी लोकप्रिय होती. ‘यहुदी’, ‘कोहिनूर’सारख्या चित्रपटांनी त्यांच्या जोडीलाही खूप लोकप्रिय केले.

Dilip Kumar and Vyjayanthimala in Naya Daur
Dilip Kumar and Vyjayanthimala in Naya Daur. Courtesy-upperstall

‘मुगल-ए-आझम’ अजूनपर्यंतच्या हिंदी चित्रपट इतिहासातील लँडमार्क चित्रपट. दिलीपकुमार आणि मधुबालाची जोडी या चित्रपटाने अतिशय लोकप्रिय करून टाकली. ‘सलीम’ आणि ‘अनारकली’ म्हणून या दोघांनी इतिहास निर्माण केला. ‘अमर’, ‘तराना’ असे अजूनही त्यांचे काही चित्रपट. दिलीप कुमारला हिंदी चित्रपटसृष्टीचा ट्रॅजेडी किंग म्हणतात. असाच एक अजून किंग ट्रॅजेडी म्हणजे गुरुदत्त. गुरुदत्त एक अतिशय टॅलेंटेड अ‍ॅक्टर-डिरेक्टर; पण दुर्दैवाने ऑन अ‍ॅण्ड ऑफ-स्क्रीनही त्याचे आयुष्य ट्रॅजिकच! गुरुदत्त आणि वहिदा रहेमानची जोडी रील आणि रियल लाईफमध्येही गाजली. एक अतिशय टॅलेंटेड अ‍ॅक्टर-डिरेक्टर आणि त्याच्या डिस्कव्हरीशी त्याचे ऑब्सेशन अगदी बहुचर्चित या दोघांचे चित्रपटही तेवढेच गाजले. ‘‘चौदवी का चाँद हो’’ची मॅजिक अगदी अविस्मरणीय. सुंदर, नाजूक वहिदा आणि डॅशिंग, यंग गुरुदत्त यांची जोडी फारच छान वाटायची. ‘प्यासा’, ‘साहिब, बिवी और गुलाम’सारखे त्यांचे इस्मॉर्टल चित्रपट आले. गुरुदत्त-वहिदा वॉज वन ऑफ द लव्हलिएस्ट ऑन-स्क्रीन कपल्स.

दिलीप कुमारबरोबर मधुबालाचा ऑन-स्क्रीन रोमान्स हिट ठरला, तसेच तिच्या ऑन-स्क्रीन हिरोबरोबरचा तिचा रोमान्सही ऑन-स्क्रीन ऑडियन्सने पसंत केला. किशोर आणि मधुबालाची जोडी खूप गाजली. अतिशय सुंदर, अल्लड अशी मधुबाला आणि मस्त मौला, फनी मॅन किशोरकुमार एकत्र फारच क्यूट वाटायचे. ‘‘एक लडकी भीगी भागी सी’’, ‘‘चलती का नाम गाडी’’मधील हे गीत अजूनही सगळ्यांच्या आठवणीत आहे, तर ‘‘पाँच रुपय्या बारा आना’’ अजूनही कित्येक फॅन्सचे फेव्हरेट! ‘झुमरू’, ‘हाफ टिकीट’सारखे चित्रपटही चालले.

या काळात देव आनंद हा अतिशय लोकप्रिय होता. या इंडियन ‘ग्रेगरी पेक’चे अनगिनत फॅन्स, देव आनंदबरोबर कित्येक नायिकांनी काम केलंय आणि या सर्वांबरोबरच त्योन हिट्स दिले आहेत. यात काहीच आश्चर्यजनक नाही. त्यावेळी देव आनंद म्हणजे इनकम्पेरेबल. त्याच्या लिडिंग लेडीजपैकी नंदा (हम दोनो), मधुबाला (काला पानी), नूतन (तेरे घर के सामने, पेईंग गेस्ट), साधना (हम दोनो), झिनत अमान (हिरा पन्ना), माला सिन्हा (माया, लव्ह मॅरेज), हेमा मालिनी (जॉनी मेरा नाम) या सर्वांबरोबरच ऑडियन्सने त्याला पसंत केले. साधना, नूतन आणि नंदाबरोबर त्याची जोडी तर फारच छान वाटायची; पण वहिदा रेहेमान आणि देव आनंदची जोडी सर्वात हिट ठरली. ‘गाईड’ हा अगदी लँडमार्क चित्रपट. वहिदा रहेमान आणि देव आनंदच्या करिअरमधला हा अगदी यादगार चित्रपटआणि त्यांची पेअर या चित्रपटामुळे अधिकच लोकप्रिय ठरली. ‘काला बाजार’, ‘सीआयडी’, ‘सोलवा साल’ हे त्यांचे इतर चित्रपट.

Dev Anand Waheeda Rehman in Prem Pujari
Dev Anand Waheeda Rehman in Prem Pujari. Courtesy- National Herald

देव आनंदप्रमाणे शम्मी कपूरही अतिशय लोकप्रिय! हिंदी चित्रपटांविषयी कोणत्याही चर्चेतून त्याचे नाव आपण वगळू शकत नाही! पण शम्मी कपूरबरोबर कुणी एक अभिनेत्री ‘परफेक्ट’ अशी निवडता येणार नाही. सायरा बानू (जंगली), शर्मिला टागोर (काश्मिर की कली, अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस), आशा पारेख (तिसरी मंजील), मधुबाला (बॉयफ्रेन्ड), माला सिन्हा (दिल देके देखो) या सर्वच नायिका शम्मी कपूरबरोबर हिट ठरल्या.

अजून एक अभिनेता ज्याच्या ‘लुक्स’वर ऑडियन्स अगदी फिदा होते तो म्हणजे राजेश खन्ना. त्याची पॉप्युलॅरिटी काही औरच! आज त्याचे काही चित्रपट बघून त्याच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगसाठी त्याला ‘ड्रामा किंग’चा खिताब द्यावास वाटतो (उदा : कुँवारा बाप, अवतार, स्वर्ग), पणा एकेकाळी त्याचे फॅन फॉलोविंग अफाट होते. ‘आराधना’, ‘अमर प्रेम’सारख्या चित्रपटांमधील काका खरोखरच लव्हेबल. त्याच्या बर्‍याच सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याची साथ दिली शर्मिला टागोरने. बॉलीवूडमधील ही आणखी एक लोकप्रिय जोडी! ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘आविष्कार’सारखे त्यांचे चित्रपट मोठे हिट ठरले. राजेश खन्ना आणि मुमताजची पेअर म्हणजे अगदी हॉट. ‘जय जय शिव शंकर’ कुणाच्या लक्षात नाही! ‘आप की कसम’, ‘आईना’, ‘अपना देश’, ‘बंधन’, ‘दो रास्ते’, ‘दुश्मन’, ‘प्रेम कहानी’, ‘राजारानी’, ‘रोटी’, ‘सच्चा झुठा’सारखे या दोघांचे खूप चित्रपट आले. राजेश खन्नाबरोबर टिना मुनीमची जोडीदेखील लोकांनी पसंत केली; पण तरीही राजेश खन्ना – शर्मिलाची बात काही वेगळीच.

Rajesh Khanna-Sharmila Tagore in Aradhana
Rajesh Khanna-Sharmila Tagore in Aradhana. Courtesy-Rediff

एक पॉप्युलर रील लाईफ आणि रीयल लाईफ कपल म्हणजे धर्मेंद्र-हेमा मालिनी. यांची ऑफ-स्क्रीन रीलेशनशिप आणि विवाह खूपच कॉन्ट्रव्हर्शियल ठरले. ऑन-स्क्रीन मात्र ही जोडी ‘नॉन कॉन्ट्रव्हर्शियली’ सुपर हिट. आज ‘शोले’मधील बसंती आणि वीरू लोकांच्या आठवणीत आहेत. या दोघांचे बरेच चित्रपट आले. ‘ड्रीमगर्ल’, ‘सीता और गीता’, ‘रझिया सुल्तान’, ‘आसपास’, ‘सम्राट’, ‘पत्थर और पायल’ हे त्यातील काही. धर्मेंद्र आणि शर्मिला टागोरची जोडीदेखील लोकांना आवडली. ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’ आणि सर्वात लोकप्रिय म्हणजे ‘चुपके चुपके’.

Dharmendra with Hema Malini
Dharmendra with Hema Malini. Courtesy-OdishaTV

धर्मेंद्र-राजेश खन्नाबरोबरचा दुसरा सुपरस्टार म्हणजे अर्थातच अमिताभ बच्चन. इनिशिअल स्ट्रगलनंतर अमिताभने सर्वांनाच मागे टाकले. बॉलीवूडच्या या अनपॅरेलल्ड सुपरस्टारचे सर्वाधिक चित्रपट हिट ठरले. बिग बीबरोबर बर्‍याच नायिका रुपेरी पडद्यावर झळकल्या. हेमामालिनी (सत्ते पे सत्ता, नसीब), झिनत अमान (पुकार), स्मिता पाटील (नमक हलाल), जया प्रदा (शराबी), रती अग्निहोत्री (कुली), श्रीदेवी (आखरी रास्ता), माधवी (अग्निपथ) सारख्या कित्येक नायिकांनी बिग बीच्या लाँग आणि इव्हेंटफूल जर्नीमध्ये त्याच्या लिडिंग लेडीजचा रोल केला; पण रेखा, जया, परवीन बॉबी आणि राखीबरोबर त्याने सर्वाधिक हिट्स दिले. रेखा-अमिताभच्या जोडीला ‘हॉट जोडी’ म्हणता येईल. त्यांच्या ऑफ-स्क्रीन अफेअरमुळे बहुतेक ही जोडी अधिकच लोकप्रिय आणि ‘टॉक्ड अबाऊट’ झाली. रेखा-अमिताभची ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीदेखील अगदी सिझलिंग. ‘खून पसीना’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘सुहाग’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘राम बलराम’सारखे त्यांचे बरेच चित्रपट आले. यापैकी एक उल्लेखनीय चित्रपट म्हणजे ‘सिलसिला’. यश चोप्राने अमिताभ-रेखा-जया या तिघांना घेऊन हा चित्रपट बनवला आणि त्यांच्या आयुष्यातील कॉन्ट्रव्हर्सी पडद्यावर आणली, यातही अमिताभ-रेखाची जोडी अगदी ‘सिझलिंग’!

Amitabh Bachchan and Rekha in Silsila
Amitabh Bachchan and Rekha in Silsila. Courtesy-Yashraj films

माझे व्होट मात्र अमिताभ आणि त्याची रीयल लाईफमधील संगिनी जयालाच! त्यांच्या जोडीला सिझलिंग कोणी म्हणूच शकत नाही! कारण जयाच्या नॉन-ग्लॅम इमेज आणि कॅरेक्टरला तो शब्द सूट होऊच शकत नाही! जया अभिनयात इतकी उत्कृष्ट की, ग्लॅमरची, मेकअपची किंवा इतर आर्टिफिशियल गोष्टींची तिला गरज भासली नाही आणि ऑडियन्सलाही उणीव जाणवली नाही. ‘जंजीर’, ‘मिली’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’, ‘शोले’ त्यांचे अविस्मरणीय चित्रपट. त्यांची केमिस्ट्री सिझलिंग नव्हे; पण सब्ड्यूड आणि टचिंग. दोघांमध्ये एक ‘अंडरलाइंग रोमॅन्स’ कायम जाणवायचा.

जया आणि रेखा अभिनयात उत्कृष्ट, त्यामुळे बिग बीबरोबर अगदी सूट व्हायच्या; पण अमिताभची मॅजिक अशी होती की, ‘सो-सो’ अभिनय करणार्‍या नायिकादेखील त्याच्यासमोर उत्तम अभिनय करायच्या. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे परवीन बॉबी. ‘अमर-अकबर-अ‍ॅन्थनी’, ‘शान’, ‘खुद्दार’, ‘कालिया’सारख्या चित्रपटांमध्ये त्यांची जोडी गाजली. ‘ग्लॅ कपल’ म्हणून अमिताभ – परवीन वॉज इजिली वन ऑफ द बेस्ट. जया अभिनयात अमिताभची खी संगिनी, रेखाची आणि त्याची केमिस्ट्री क्लिक झाली, तर परवीन बॉबीने ग्लॅमर अ‍ॅड केला; पण राखीची आणि अमिताभच जोडी हिट का झाली, हे मला कधीच कळले नाही. यांचे बरेच चित्रपट आले आणि ते चाललेदेखील; पण दोघांमध्ये केमिस्ट्री नावाची काही चीजच नाही! ‘कस्में वादे’ चित्रपटातील त्यांचे ‘कस्मे वादे निभाएंगे हम’ हे गीत त्यांच्या ‘लॅक-लस्चर’ केमिस्ट्रीचे उत्तम उदाहरण! जबरदस्तीचा रोमॅन्स हा असा असतो. ‘कस्मे वादे’शिवाय ‘बरसात की इक रात’, ‘त्रिशूल’, ‘कभी कभी’सारखे त्यांचे बरेच चित्रपट होते; पण ही जोडी ऑडियन्सने कशी काय पसंत केली कुणास ठाऊक!

Rishi Kapoor with Neetu Singh in Kabhi Kabhie
Rishi Kapoor with Neetu Singh in Kabhi Kabhie. Courtesy- Yashraj films

याच पिरियडमध्ये ऋषी कपूर आणि नीतूसिंगची जोडीदेखील गाजली. कपूर खानदानातील सर्वात गुड लुकिंग ऋषी आणि त्याची ऑफ-स्क्रीन पार्टनर नीतूची जोडी यंग, कॉलेज गोइंग टाईपच्या कपल्समधील सर्वात लोकप्रिय. त्यांच्या ऑफ-स्क्रीन रोमान्सने ऑन-स्क्रीनही मॅजिक क्रिएट केली. ‘कभी-कभी’, ‘खेल खेल में’, ‘रफू चक्कर’, ‘अमर-अकबर-अ‍ॅन्थनी’ हे त्यांचे काही हिट चित्रपट. ऋषी-नीतू म्हणजे बॉलीवूडमधील क्युटेस्ट कपल असे म्हणायला हरकत नाही! ऋषी आणि नीतूची पेअर क्यूट, तर ऋषी आणि डिंपल कपाडियाची पेअर हॉट! राज कपूरच्या बॉबीमध्ये दोघांनी डेब्यू केले. ‘बॉबी’ तुफान चालला. राज कपूरच्या इतर चित्रपटासारखा बॉबीदेखील बर्‍यापैकी कॉन्ट्रव्हर्शियल; पण त्यामुळे डिंपल ‘हॉट’ नायिका आणि ही जोडीदेखील ‘हॉट’ ठरली. त्यानंतर डिंपलने संन्यास घेतला आणि एकदम ‘सागर’मध्ये उगवली. ऋषी आणि डिंपलचा हा चित्रपटही बॉबीसारखाच. बिकिनीमधील डिंपल आणि ‘‘पास आओ ना’’ या गाण्याने ‘सागर’ला खूप लोकप्रिय करून टाकले. ऋषी-डिंपल वॉज डेफिनेटली वन ऑफ द मोस्ट सिझलिंग कपल्स. डिंपल कपाडियाच्या कमबॅकनंतर ऑडियन्सने तिला जॅकी श्रॉफबरोबरही पसंत केले. ‘काश’, ‘राम-लखन’, ‘अंगार’, ‘गर्दिश’ अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये हे दोघे एकत्र दिसले.

याच वेळी आणखी एक जोडी अतिशय लोकप्रिय ठरली. ती म्हणजे ‘तेजाब’मधील मुन्ना-मोहिनीची, अर्थात अनिल कपूर-माधुरी दीक्षितची. ‘हिफाजत’ साफ आपटला; पण अनिल-माधुरीचे इतर बरेच चित्रपट सुपरहिट झाले. यामध्ये सर्वात प्रॉमिनन्ट म्हणजे माधुरीला ‘माधुरी’ बनविणारा ‘तेजाब’. दोघांची केमिस्ट्री इन्स्टंट हिट ठरली. ‘प्रतिकार’, ‘जीवन एक संघर्ष’, ‘जमाईराजा’, ‘खेल’सारखे चित्रपट फलॉपा झाले. या चित्रपटांनी जणू सिद्ध केले की, अभिनेते कितीही उत्कृष्ट असले आणि जोडी कितीही लोकप्रिय असली, तरीही चित्रपटात इतर गोष्टींनाही महत्त्व देणे जरूरी आहे! (उदा. पटकथा, दिग्दर्शन इ.) पण चित्रपट हिट असो की, फलॉप, अनिल-माधुरीची जोडी मात्र अगदी सुपरहिट!

Anil Kapoor with Madhuri Dixit
Anil Kapoor with Madhuri Dixit

माधुरी दीक्षित आणि संजय दत्तही बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र होते; पण ऑन-स्क्रीनपेक्षा त्यांच्या ऑफ-स्क्रीन अफेअरमुळे ते जास्त टॉक्ड-अबाऊट होते. ‘खलनायक’ हा त्यांचा सर्वात मोठा हिट. त्यांचे इतर चित्रपट तर बरेचजण विसरलेही असतील.
गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या जोडीने तर त्या काळात तहेलकाच घातला! डेव्हिड धवनच्या टाईम-पास कॉमेडीजमध्ये हे दोघे लोकांचे एकदम लाडके झाले. ‘हिरो नं. वन’, ‘कुली नं. वन’, ‘खुद्दार’, ‘राजा बाबू’, ‘हसीना मान जाएगी’सारखे त्यांचे कित्येक चित्रपट आले. या वेड्या कॉमेडीजमधल्या वेडेपणामध्ये दोघांनी एकमेकांची उत्कृष्ट साथ दिली आणि ऑडियन्सचे फेव्हरेट झाले.

आमीर खान आणि जुही चावलाचा डेब्यू मूव्ही ‘कयामत से कयामत तक’ खूप मोठा हिट झाला. ही बॉलीवूडमधील सर्वांत क्यूट पेअर. लहानसे, निरागस, लव्हेबल आमीर आणि जुहीची जोडी या चित्रपटापासून क्लिक झाली. यानंतर त्यांचे बरेच चित्रपट आले. ‘दौलत की जंग’, ‘तुम मेरे हो’, ‘लव्ह लव्ह लव्ह’ फलॉप झाले, तर ‘हम है राही प्यार के’ आणि ‘इश्क’ हिट.
जुहीनंतर शाहरुख खानबरोबर बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली. क-क-क-क-किरण म्हणत ‘डर’पासून शाहरुखने जुहीबरोबर आपल्या चित्रपटांना सुरुवात केली आणि ही जोडी खूप लोकप्रियही झाली. ‘राजू बन गया जन्टलमॅन’, ‘येस बॉस’ खूप चालले. ‘डुप्लिकेट’, ‘फिर भी दिल है हिन्दुस्तानी’खेरीज काही फरगेटेबल चित्रपटही आले; पण आमीर-जुहीची मॅजिक समहाऊ या पेअरमध्ये नव्हती.

Shahrukh Khan and Kajol in DDLJ
Shahrukh Khan and Kajol in DDLJ- Courtesy-Yashraj films

शाहरुख खान आणि काजोलची जोडी मात्र अमेझिंग! दोघांची एनर्जी, दोघांची केमिस्ट्री अगदी लाजवाब. एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी ही जोडी राज कपूर आणि नर्गिसनंतर मोस्ट पॉप्युलर म्हणायला हरकत नाही. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने सर्व रेकॉर्ड तोडले आणि या दोघांना लोकप्रियतेच्या शिखरावर ठेवले. ‘तुझे देखा तो’मधील शाहरुख आणि काजोल बॉलीवूडमधील सर्वात लव्हेबल कपल म्हणायला हरकत नाही. दोघांच्या इन्टेन्सिटीने त्यांना सर्वात रोमॅन्टिक जोडी बनविले. ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ हेही सुपरहिटच ठरले. आता करण जोहरच्या आगामी चित्रपटाची सर्व आतुरतेने वाट बघत आहेत, कारण यात बर्‍याच वर्षांनंतर पुन्हा काजोल आणि शाहरुख एकत्र येणार आहेत. शाहरुखबरोबर राणी मुखर्जीची जोडीही ऑडियन्सने पसंत केली. ‘कुछ कुछ होता है’, ‘चलते चलते’, ‘कभी अलविदा ना कहेना’ हे त्यांचे काही चित्रपट.

शाहरुख आणि राणीप्रमाणेच राणी आणि सैफची जोडीही लोकांना आवडली. ‘हम तुम’ मोठा हिट झाला, तर ‘तारा रम पम’ आणि ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ फार चालले नाही; पण सैफ आणि राणी लोकांना आवडलेल्या पेअर्समध्ये मोजले जाऊ शकतात. या सर्वांमध्ये बेस्ट मात्र राणी आणि अभिषेकची जोडी. त्यांचा पहिला चित्रपट ‘बस इतनासा ख्वाब है’ फलॉप झाला; पण याच्यानंतरच्या त्यांच्या चित्रपटांमध्ये त्यांच्या जोडीची मॅजिक अगदी एव्हिडन्ट होती. ‘बंटी और बबली’ आणि ‘युवा’ खूप मोठे हिट ठरले. एकमेकांना एकदम सूट करणारे हे कपल रियल लाईफमध्येही एकत्र येणार की काय, अशा बर्‍याच चर्चा होत्या; पण ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाने सर्व प्रश्‍नांची उत्तरं दिली.

अमिताभ-जयाप्रमाणेच अभिषेक आणि ऐश्वर्यानेही बरेच चित्रपट एकत्र केले. त्यातला ‘गुरू’ सर्वात अविस्मरणीय. त्यांचे ऑफ-स्क्रीन अफेअर चालू झाल्यानंतरच्या या चित्रपटात त्यांची केमिस्ट्री अगदी एव्हिअन्ट होती. या चित्रपटाच्या अगोदरचे अभी-एशचे सर्वच चित्रपट आपटले. ‘कुछ ना कहो’, ‘उमराव जान’ साफ आपटले. 

ऐश्वर्याची हृतिकबरोबरची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री टू गुड. ‘धूम 2’ मध्ये हे दोघे प्रथम एकत्र आले और धूम मच गई! लोकांनी या जोडीला डोक्यावर उचलले; पण त्यांच्या किसिंग सीनने बर्‍याच कॉन्ट्रव्हर्सी निर्माण केल्या. यानंतर आता ‘जोधा अकबर’. ‘जोधा अकबर’ने दोघांना अजूनच लोकप्रिय केले. हृतिक आणि ऐश्वर्या या एका चित्रपटाच्या जोरावर बॉलीवूडमधील एक सर्वात रोमॅन्टिक पेअर म्हटली जाऊ शकते. अभिषेक ऐश्वर्याचा रियल लाईफ पार्टनर असला तरीही ऑन-स्क्रीन हृतिक आणि ऐश्वर्याच्या जोडीला काही कम्पॅरिझनच नाही.

गेल्या बर्‍याच वर्षांमध्ये एक हिरो लोकप्रियतेच्या रेसमध्ये सर्वांच्या पुढे राहिला आहे. तो म्हणजे अक्षयकुमार. आजच्या टफ कॉम्पिटिशनमध्ये अक्षयने त्याच्या सर्वच प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. आपल्या कोस्टार्सच्या बाबतीत बराच कॉन्ट्रव्हर्शियल राहिला आहे. शिल्पा रेड्डी, रविना टंडन, प्रियंका चोप्रा या सर्वांबरोबरच त्याला लिंक केले गेले. अक्षयच्या लिडिंग लेडीज बर्‍याच आणि त्याने जवळ-जवळ सर्वांबरोबरच हिट दिले. ‘मै खिलाडू तू अनाडी’, ‘धडकन’ हे त्याचे शिल्पाबरोबरचे हिट्स. रविनाबरोबर तर अक्षयने 10-12 चित्रपट केले. ‘मोहरा’ आणि ‘खिलाडियो का खिलाडी’. त्याचे दोन हिट प्रियांका चोप्राबरोबरचे ‘एतराज’, ‘वक्त’ आणि ‘मुझसे शादी करोगी’ सगळ्यांनाच लक्षात राहिले; पण अक्षयचे सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट पेअरिंग झाले ते कॅटरिना कैफबरोबर. गेल्या तीन वर्षांमध्ये ही सर्वात हॉट सेलिंग पेअर. या दोघांचे सर्वच चित्रपट हिट झाले. चित्रपट कसाही असला तरी अक्षय आणि कॅटरिना आहेत म्हटल्यावर तो हिट होणारच. ‘नमस्ते लंडन’, ‘वेलकम’, ‘सिंग इज किंग’ हिट झाले. ‘नमस्ते लंडन’खेरीज इतर दोन्ही ‘स्टुपिड कॉमेडीज’पण अक्षय-कॅटरिनाने हेही हिट करून दाखविले. अक्षय आणि त्याच्याबरोबर सुंदर, रेखीव कॅटरिना म्हणजे जणू सोने पे सुहागा. ऑडियन्सने ही जोडी खूप पसंत केली.

आजकाल हिरो-हिरोईन्सची रीयल लाईफ अफेअर्स अगदी खुल्लमखुल्ला असतात. एकेकाळी जे लपूनछपून चालायचे ते आज अगदी उघड-उघड चालते. अशी कपल्स मॅक्झिमम चित्रपट एकत्र करायला बघतात. याचे उदाहरण द्यायचे, तर शाहीद कपूर आणि करिना कपूर सर्वात प्रथम आठवतात. या दोघांचे अगदी बहुचर्चित अफेअर चालले होते. दोघांनी बरेच चित्रपट एकत्र साईन केले. यावेळी करिना टॉपच्या हिरोईन्समध्ये होती, तर शाहीद स्ट्रग्लर. त्याच्या करियरला बूस्ट देण्यासाठी तिने त्याच्याबरोबर खूप चित्रपट केले. ‘चुपचुपके’, ‘फिदा’, ‘36 चायना टाऊन’ असे त्यांचे बरेच चित्रपट आले; पण सर्व फलॉप ठरले. आयरॉनिकली, त्यांचा ‘जब वी मेट’ सुपरहिट ठरला आणि लोकांनी त्यांना एक्सेप्ट केले; पण तोपर्यंत त्यांचा ब्रेक-अप झाला होता. आता ऑडियन्सला वाटले तरीही यांचे ऑन-स्क्रीनही एकत्र येणे असंभवच!

याउलट शाहीद आणि अमृताला लोकांनी खूप पसंत केले. ‘इश्क विश्क प्यार ब्यार’, ‘विवाह’सारखे त्यांचे चित्रपट हिट झाले. हे कदाचित बॉलीवूडचे सर्वात इनोसन्ट आणि क्यूट कपल.

या सर्वांखेरीज काही उल्लेखनीय जोड्या म्हणजे राजेन्द्रकुमार-साधना, राजकुमार-मीनाकुमारी, राजेश खन्ना-आशा पारेख, सुनील दत्त – नूतन, रेखा – विनोद मेहरा, फारुख शेख – दीप्ती नवल, सलमान – करिश्मा, अमोल पालेकर – विद्या सिन्हा, जितेन्द्र – जयाप्रदा, जितेन्द्र – श्रीदेवी, अजय देवगण – काजोल, रती – कमल हसन अशाही अनेक जोड्या होत्या, ज्यांचा एखादाच चित्रपट हिट झाला, पण तेवढ्यातच त्यांनी ऑडियन्सच्या मनात घर केले. जसे भाग्यश्री – सलमान (मैंने प्यार किया), मनीषा कोईराला – अनिल कपूर (1942 – अ लव्ह स्टोरी), विद्या बालन – जॉन अब्राहम (सलाम – ए – इश्क).

असे आपले हे लोकप्रिय ऑन-स्क्रीन रोमॅन्सेस! कोणत्या जोड्या हॉट, तर कोणत्या इनोसन्ट, कोणत्या क्यूट, तर कोणत्या इन्टेन्स, काही लव्हेबल, तर काही इम्मॉर्टल. आपल्या चित्रपटांना यादगार बनविणार्‍या या जोड्या सर्वांच्या आठवणीत कायमच राहतील!

Vrushali Jimmy
+ posts

Leave a comment