परिणीती चोप्राला तिच्या ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटातील कामासाठी भरपूर प्रशंसा व वाहवा मिळत आहे. परिणितीने या चित्रपटात केलेला अभिनय प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत असा झाला असून 26 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतेच चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले असून त्याला रसिकांचा, चाहत्यांचा व चित्रपट उद्योगातील नामांकित कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

एमिली ब्लंट स्टारर याच नावाच्या चित्रपटाच्या अधिकृत रीमेकमध्ये परिणितीने केलेल्या अभिनयाचे ​​कौतुक चित्रपट उद्योगातील अनेक नामांकित व्यक्तींनी केले आहे.

प्रियंका चोप्रा यांनी ट्विटरद्वारे लिहिले की, “मला परिणितीचा अभिमान वाटतो व मी हा चित्रपट बघण्यास उत्सुक आहे.

सोनम कपूर लिहिते,” गो परी! “;

Parineeti Chopra in The Girl on the Train Movie

या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना अर्जुन कपूरने लिहिले- “ओहो ..काय शानदार आगमन आहे !!!” तर वरुण धवन लिहितो की “परी, मी याची उत्सुकतेने वाट पहात आहे.”  

पहा टीझर येथे-
 

Website | + posts

Leave a comment