सध्याच्या काळात वेबसिरीज चा एक हमखास प्रेक्षकवर्ग बनला आहे जो आतुरतेने नवीन वेबसिरीजची वाट बघत असतो. दोन आठवड्यांपासून ज्या सीरिजच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती त्या अमेझॉन प्राईम व्हिडीओ च्या आगामी ‘तांडव’ चे आज ट्रेलर लॉन्च झालं आहे. सैफ अली खान आणि डिंपल कपाडिया यांच्या मधील राजकीय द्वंद्व असलेल्या ‘तांडव’ चे दिग्दर्शन अली अब्बास जफर याने केले आहे. ‘तांडव’ राजकारणाचे अनेक पैलू आणि रंग दर्शवितो. ‘तांडव’ मध्ये प्रेक्षकांना हे अनुभवास येईल की सत्तेच्या जगात ना काही ब्लॅक असते ना व्हाईट तर सर्व काही ग्रे असते. 

अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या सिरीजमध्ये  सैफ आणि डिंपल व्यतिरिक्त सुनील ग्रोव्हर, मोहम्मद झीशान अयूब, तिग्मांशु धुल्या, कुमुद मिश्रा, गौहर खान, कृतिका कामरा, दिनो मोरिया आणि सायरा जेन डायझ असे  एकाहून एक कलाकार आहेत. इतकी तगडी स्टारकास्ट असल्यावर प्रत्येकाचा अभिनय कसा असेल हे ट्रेलर पाहिल्यावर लगेच लक्षात येते. तांडव ही सिरीज दिग्दर्शक अली अब्बास जफरचे डिजिटल अथवा ओटीटी जगतात ठेवलेले पहिले पाऊल आहे.  ही मालिका ९ एपिसोडमध्ये तयार करण्यात येणार असून अमेझॉन प्राइमवर १५ जानेवारीला प्रदर्शित होईल.

तांडव चे ट्रेलर बघा इथे – 

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.