वर्षाअखेरीस नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळवून कौतुकाची थाप मिळवली आहे!

नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी एका पाठोपाठ एक अशा सर्वोत्कृष्ट भूमिका साकारून अव्वल स्थान मिळवत मनोरंजन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. यावर्षी, ‘रात अकेली है’ मधील त्यांच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल, त्यांना एका अग्रगण्य व्यासपीठावर ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ या पदवीने गौरविण्यात आले.

त्यांच्या मुकुटामध्ये आणखी एक मनाचा तुरा जोडताना, नवाजुद्दीन ‘जटील यादव’ या भूमिकेबद्दल, रात अकेली है या चित्रपटातील जटिल भावनांचे वर्णन करणार्‍या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेबद्दल ही प्रतिष्ठित काळी बाहुली मिळाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला. या प्रतिभावान अभिनेत्याने भूतकाळातील त्याच्या अभिनयाने आपल्या सर्वांना नेहमीच प्रभावित केले आणि ‘रात अकेली है’ नक्कीच या वर्षातील सर्वात प्रमुख कलाकृती होती. या चित्रपटातील नवाजुद्दीनच्या भूमिकेने प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप प्रेम मिळवले होते आणि त्यांनी त्यांची निर्दोष कामगिरी स्पष्टपणे दर्शविली होती.

Nawazuddin Siddqui in Raat Akeli Hai
Nawazuddin Siddqui in Raat Akeli Hai. Image Courtesy-Netflix

 

एक कलाकार म्हणून त्याने ओटीटीच्या जगात मालिकेसह चित्रपटांमध्ये अविश्वसनीय कामगिरी करून आपले स्थान मजबूत केले आहे. यासाठी त्याचे सर्व स्तरातून कौतुक झाले आणि हा विशिष्ट विजय महत्त्वपूर्ण ठरला आहे कारण २०२० हे संपायच्या मार्गावर आहे. यापूर्वी, सेक्रेड गेम्समधील त्याचे काम आणि सीरियस मेन मधील काम आणि चित्रपटातील त्यांच्या नेत्रदीपक सादरीकरणाचे खूप कौतुक केले. हा असा अभिनेता आहे जो सदैव ती भूमिका जगतो आणि या गुणवत्तेमुळे त्याने एक अष्टपैलू कलाकार होण्यासाठी आणि प्रत्येक प्रॉजेक्टमध्ये आपले कलागुण दाखवून दाद मिळवली आहे.

‘रात अकेली है’ साठी प्रतिष्ठित ब्लॅक लेडी मिळणे हा माझा खूप मोठा सन्मान आहे. २०२० हे आपल्यातील बहुतेकांसाठी एक आव्हानात्मक वर्ष होते परंतु मला आनंद आहे की यावर्षी ‘रात अकेली है’ आणि ‘सिरीयस मेन’ यांमधून मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकलो. या महामारी दरम्यान उत्तम आशय हा प्रत्येकासाठी एक आधार यंत्रणा ठरली आहे. सर्व कठोर परिश्रमांचे चीज झाले, याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि अभिनेते, निर्माते, लेखक आणि त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी ही कौतुकाची बाब आहे. पुढील वर्षी इतर ध्येय गाठण्यासाठी मिळणारी ही एक प्रेरणा आहे.”

नवाजुद्दीन आगामी ‘बोले चुडिया’, ‘संगीन’ आणि ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटांमधून दिसणार आहे. 

 

Website | + posts

Leave a comment