‘हॅलो…बोला…सनम हॉट लाइन’… पुष्करचा नवा अंदाज!

‘सनम हॉट लाइन’ ही एक हलकीफुलकी कॉमेडीचा पंच असलेली वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यानिमित्ताने पुष्कर जोग आणि सई लोकूर ही प्रत्यक्षात खूप चांगल्या मित्रमैत्रीणीची जोडी ऑनलाइन स्क्रीनवरही विनोदाची बरसात करत आहे. बिग बॉस या शोनंतर पुष्कर या नव्या वेबसिरीजमधून त्याच्या चाहत्यांना भेटणार आहे. सध्या मनोरंजनाच्या जगात ओटीटी प्लॅटफॉर्म धमाल करत आहे. ज्यांना मनातलं बोलायचं आहे आणि ज्यांना ते मनातलं ऐकायचं आहे अशा दोन प्रकारच्या लोकांच्या संवादातून काय भन्नाट घडू शकतं याची बिनधास्त गोष्ट असलेल्या ‘सनम हॉट लाइन’चा नायक पुष्कर जोग ने ‘नवरंग रुपेरी’च्या अनुराधा कदम यांच्याशी मारलेल्या दिलखुलास व एक्स्क्लुजिव्ह गप्पा

 
आपल्याला एकच काम येतं…आणि ते म्हणजे फोनवर बोलण्याचं. मग आपण हेच काम करून पैसे मिळवू शकतो. एक मैत्रीण आणि दोन मित्रांच्या या त्रिकूटाच्या मास्टरमाइंडमधून ही कल्पना येते आणि त्यानंतर पुढच्या पाच भागात ऑनस्क्रीन जो काही धुमाकूळ सुरू होतो जो प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. सनम हॉट लाइन या वेबसिरीजची ही वन लाइन स्टोरी. ८ डिसेंबरला सनम हॉट लाइनची रिंग ओटीटीच्या पडद्यावर वाजली आहे आणि पहिल्या  पाच दिवसात या वेबसिरीजला मिळालेल्या प्रतिसादाने सध्या या वेबसिरीजचा नायक पुष्कर जोग प्रचंड खुश आहे.


“ही एक हलकी फुलकी कॉमेडी आहे. बोल्ड आहे पण अश्लील नाही” असं सांगतच पुष्करने या वेबसिरीजच्या निमित्ताने संवाद साधला. सनम हॉट लाइनमध्ये नेमकं काय आहे हे पुष्करकडून जाणून घेण्यात एक वेगळीच मजा आली. पुष्कर सांगतो, “फोन अ फ्रेंड अशा जाहिराती आपल्या नेहमीच नजरेला पडतात. आज खरच अशा अनेक व्यक्ती आहेत की त्यांना खूप बोलायचं आहे पण त्यांचं ऐकून घ्यायला कुणाला वेळ नाही. मग त्यातूनच फोन अ फ्रेंडची संकल्पना आली आहे. सनम हॉट लाइनमध्ये हाच फ्लेवर आहे.”

pushkar jog in sanam hotline
‘बिग बॉस’ या शोच्या पहिल्या सीझनमध्ये पुष्कर जोग विजेता ठरला नसला तरी त्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यानंतर ‘ती अँड ती’, ‘वेल डन बेबी’ हे दोन सिनेमेदेखील पुष्करने केले. ‘वेल डन बेबी’ हा त्याचा सिनेमाही ओटीटीवर प्रदर्शित झाला होता आणि आता ‘सनम हॉट लाइन’ ही वेब सिरीजही ऑनलाइन रिलीज झाला. याबद्दल बोलताना पुष्करने लक्ष वेधले ते कोरोनामुळे थांबलेल्या मनोरंजनविश्वाकडे. पुष्करच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, “गेल्या आठ महिन्यांपासून सगळच थांबलं होतं. कोरोनामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात खूप उलथापालथ झाली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, नोकऱ्या कशाबशा टिकल्या असतील तर पगार कमी झाला. व्यावसायिक होते त्यांची उलाढाल घटली. ‘सनम हॉट लाइन’ या वेबसिरीजचा बाज जरी विनोदाचा असला तरी त्याचा स्टोरीबेस याच परिस्थितीशी जोडलेला आहे. या वेबसिरीजमध्ये मी, सई आणि उदय हे तीन मित्र आहोत जे कॉल सेंटरमध्ये जॉब करत असतो. पण कोरोनामुळे आमच्या तिघांच्याही नोकऱ्या जातात आणि आता पुढे काय करायचे हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहतो. खूप विचार केल्यावर आमच्या तिघांच्याही असं लक्षात येतं की, जुन्या नोकरीमध्येही आपण फोनवर बोलण्याचाच पगार घेत होतो. मग हॉट लाइन सुरू करून पैसे मिळवूया. ती हॉट लाइन म्हणजेच सनम हॉट लाइन. मग ज्यांना खूप काही बोलायचे आहे त्यांच्याशी पैसे घेऊन बोलण्याचा या तीन मित्रांचा फंडा सुरू होतो. पण पुढे एका खंडणी प्रकरणात हे त्रिकूट नाहक कसे अडकते, त्यानंतर त्यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा कसा लागतो, आम्ही निर्दोष आहोत हे पोलिसांना सांगताना काय दमछाक होते आणि या सगळ्यामध्ये सनम हॉट लाइनवर फोन करणारे किती पर्सनल गोष्टी बोलतात अशी सगळी भन्नाट कॉमेडी करताना खूपच मजा आली. वास्तवात घडणारा विषय या वेबसिरीजमधून मांडताना धमाल केली.”

pushkar jog in sanam hotline
पुष्कर जोग आणि सई लोकूर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी बिगबॉसमध्ये पाहिली आहे. या केमिस्ट्रीचा ‘सनम हॉट लाइन’ मध्ये किती फायदा झाला हे विचारताच क्षणाचाही विलंब न करता पुष्करने ‘नक्कीच फायदा झाला’ असं सांगत, “एकूणच ही वेबसिरीज आमच्या सगळ्यांचीच भट्टी जुळून आल्याची परफेक्ट गोष्ट आहे यावर शिक्कामोर्तब केलं. विनय येडेकर हे या वेबसिरीजमध्ये पोलिस इन्स्पेक्टर आहेत. त्यांच्या विनोदाचे टायमिंग खूपच भारी आहे. हॉट लाइनवर येणाऱ्या फोनवर पलिकडून बोलणाऱ्या मुलींच्या प्रॉब्लेम्सवर उदयच्या रिअॅक्शन कमाल आहेत.”

pushkar jog in sanam hotline web series

“सईशी जेव्हा काही मुली त्यांच्या बॉयफ्रेंडसोबतच्या रिलेशनशीपविषयी बोलताना दाखवल्या आहेत त्यानंतर तिच्या मनात होणारी घुसळणीचे बेअरिंग तिने अचूक पकडले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ही आमची वेबसिरीज प्रत्येकाच्या आयुष्याशी जवळीक साधणारी आहे. आज खरोखरच माणसाला त्याच्या मनातलं ऐकून घेणारं कुणीतरी हवं आहे. ते माणूस जवळ नसेल तर लोक एकटेपणाला जवळ करतात आणि त्यातून अनेक चुकीच्या गोष्टी घडतात.” विनोदाची पेरणी करत समाजातील एका गंभीर विषयावरही मार्मिक बोट ठेवल्याचे पुष्कर सांगतो.

Anuradha Kadam
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.